INDvsENG, Chennai 2nd Test, AXAR PATEL, Spinners taking five fer on Test debut, India, Record  
क्रीडा

INDvsENG : अश्विननंतर अक्षरनं रचला इतिहास, निम्म्या संघाला एकट्यानं केलं गारद

सकाळ ऑनलाईन टीम

India vs England, 2nd Test : पहिल्या डावात अश्विनने इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडल्यानंतर दुसऱ्या डावात अक्षरने आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. पदार्पणातील सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या मोजक्या फिरकीपटूंच्या यादीत तो सामील झालाय. पदार्पणातील कसोटी सामन्यात निम्मा संघ गारद करण्याचा खास विक्रम त्याने चेन्नईच्या मैदानात आपल्या नावे केला.

व्हीव्ही कुमार यांनी सर्वात पहिल्यांदा पदार्पणातील कसोटी सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. 1960-61 दरम्यान त्यांनी पाकिस्तान विरुद्ध रंगलेल्या सामन्यात दिल्लीच्या मैदानात  64 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या होत्या. चेन्नईच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्द झालेल्या कसोटी सामन्यात डी. दोषी यांनी 1979-80 मध्ये निम्याहून अधिक खेळाडूंना तंबूत धाडले होते. 103 धावा खर्च करुन त्यांनी 6 बळी बाद केले होते.

नरेंद्र हिरवाणी यांनी पदार्पणात सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम नोंदवला होता. त्यांनी दोन्ही डावात प्रत्येकी 8-8 विकेट घेतल्या होत्या. यासाठी अनुक्रमे त्यांनी 61 आणि 75 धावा खर्च केल्या होत्या. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 1987-88 च्या सामन्यात त्यांनी हा पराक्रम केला होता. 

2008-09 मध्ये अमित मिश्राने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. मोहालीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने 47 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने पदार्पणातील सामन्यात दमदार कामगिरी केली होती. दिल्लीच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळताना अश्विनने 41 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या होत्या. 

चेन्नईतील मैदानातील पहिल्या डावात अक्षर पटेलनं 40 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या. यात त्याने पहिली विकेटही ज्यो रुटच्या रुपात घेतली होती. त्याच्यासोबत त्याने मोईन अलीचीही विकेट घेतली होती. दुसऱ्या डावात त्याने सिब्ले 3(25), जॅक लीच 0(1), ज्यो रुट 33(92), ओली पोप 12(20) आणि ओली स्टोन याला  खातेही उघडू दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गेल्यावेळी मुंबईत धिंगणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT