prasidh krishna
prasidh krishna  Twitter
क्रीडा

इंग्लंड दौऱ्यावर सिलेक्शनची गूड न्यूज 'प्रसिद्ध' झाली, पण...

सुशांत जाधव

आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि भारतीय संघातील (Team India) जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19 Positive) आढळला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या (England Tour) कसोटी संघात त्याची नुकतीच निवड झाली होती. पण आता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे इंग्लंडला जाण्याची त्याची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला कोलकाताच्या ताफ्यातील तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी वरुण चक्रवर्ती, संदीप वारियर, न्यूझीलंडचा टि सीफर्ट यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध कृष्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

एक दिवसापूर्वीच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांया कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय संघात प्रसिद्ध कृष्णाला राखीव गोलंदाज म्हणून स्थान देण्यात आले होते. त्याच्याशिवाय अभिमन्यु ईश्वरन, आवेश खान आणि अर्जन नगवासवाला यांचा स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समावेश होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 18 जून रोजी न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी या दौऱ्यावर जाणारे खेळाडू 8 दिवस बायोबबलमध्ये राहणार आहेत. 25 मे पासून खेळाडू बायोबबलमध्ये असतील. आठ दिवसांचा क्वारंटाईन कालावधीनंतर विशेष चार्टर्ड प्लेनने टीम इंडिया इंग्लंडला रवाना होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामना साउथहॅम्टनच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल. नॉटिंघम येथे पहिला सामना खेळवण्यात येईल. 12 ते 16 ऑगस्ट दुसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानात नियोजित आहे. 25 ते 29 ऑगस्ट तिसरा कसोटी सामना लीड्स, 2 ते 6 सप्टेंबर ओव्हल आणि 10 ते 14 सप्टेंबर रोजी मॅचेस्टरच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची लढत नियोजित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT