ashish-shelar  Sakal
क्रीडा

शेलारांच 'आयपीएल'प्रेम; सामान्य चाहत्यांसाठी विधानसभेत बॅटिंग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती मुंबईतील (Mumbai) तीन स्टेडियमसह पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहेत. या सामन्यावेळी स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के चाहत्यांना एन्ट्री दिली जाणार आहे. ही मर्यादा वाढवून स्टेडियम क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेनं प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत केलीये.

आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय पाटील या स्टेडियममध्ये 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, असे ते म्हणाले आहेत. विधानसभेत मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार या विषयावरील चर्चेवेळी त्यांना आयपीएल स्पर्धेसंदर्भात मुद्दा मांडला.

क्रिडा क्षेत्रासंदर्भात आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईत होणा-या आयपीएल (IPL 2022) सामन्यांबाबतच्या मुद्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, मुंबईतील नियोजित सामान्यांसाठी स्टेडियमध्ये 25 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. यातील काही जागा शासनाला द्यावा लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अल्प तिकिटे उपलब्ध होतील. त्यामुळे एमसीएच्या (MCA) वतीने याबबात क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून राज्य सरकारने 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सतर्कतेच्या सूचना

केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला नव्या कोविड -19 च्या व्हॅरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिलाय. युरोपीय देशांसह दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला एका पत्राच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे. याचा परिणाम आयपीएल सामन्यांवर होऊ शकतो. राज्य सरकार प्रेक्षकांशिवाय बंद दाराआड सामने घेण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चाही सध्या रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT