IPL 2022 Mega Auction:
IPL 2022 Mega Auction: Sakal
क्रीडा

IPL Auction : प्रेमाच्या आठवड्यात खेळाडूंवर होणार पैशांची बरसात!

सुशांत जाधव

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश होणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील संघांची संघ्या 10 होईल. आगामी हंगामापूर्वी सर्व संघ नव्याने संघ बांधणी करतील. त्यासाठी मेगा लिलावाकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.

पीटीआयने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, 7 आणि 8 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा लिवाव पार पडणार आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नियोजन पार पडले तर प्रेमाच्या आठवड्यात (Valentine's week) खेळाडूंवर पैशांची बरसात झाल्याचे चित्र पाहायला मिळेल. आयपीएलमधील हा लिलाव अखेरचाही ठरु शकतो. कारण बऱ्याच फ्रेंचायझींनी ही पद्धत बंद करावी, अशी भावना व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाच्या संकटातून आता आपण सावरतो आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया ही भारतामध्येच होईल. मेगा लिलावाची दोन दिवसीय प्रक्रिया 7 आणि 8 फेब्रुवारीला पार पडणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे."

आयपीएलच्या आगामी हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. या दोन्ही संघांना आयपीएलच्या लिलावातील ड्राफ्टमधून प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करायची आहे. मेगा लिलावापूर्वी हे दोन्ही संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करुन घेणार हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. नव्या फ्रेंचायझींसाठी ख्रिसमसपर्यंत ही नावे जाहीर करायची आहेत. यात बीसीसीआयकडून मुदतवाढ मिळू शकते. कारण सीव्हीसीच्या मंजूरीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

अनेक फ्रेंचायझींचा लिलाव प्रक्रियेला विरोध

बहुतांश फ्रेंचायझींनी तीन वर्षंतून होणाऱ्या लिलाव प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. प्रत्येक तीन वर्षानंतर होणाऱ्या लिलावामुळे संघातील समतोल ढासळतो. संघ बांधणीसाठी घेतलेली मेहनत वाया जाते, असा युक्तीवाद लिलावाबाबत सुरु आहे. बीसीसीआयने फ्रेंचायझींच्या मताचा सकारात्मक विचार केल्यास यंदाचा लिलाव अखेरचाही ठरु शकतो.

रिटेन प्रकियेमध्ये अनेक दिग्गजांना मिळाला नारळ

विद्यमान आठ फ्रेंचायझींनी मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार, खेळाडूंना रिटेन केले आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीला रिटेन केले. अनेक संघांनी दिग्गजांना रिलीज केले. खास करुन मुंबई इंडियन्सने पांड्या बंधूला घरचा रस्ता दाखवला. ही दोघ आगामी आयपीएलमध्ये अहमदाबादच्या संघाकडून खेळताना दिसू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी CSK च्या 'गुरु'ची चर्चा! पाच वेळचा IPL विजेता कोच घेणार द्रविडची जागा?

IPL 2024 DC vs LSG Live Score: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

SCROLL FOR NEXT