AB De Villiers Advice To Virat Kohli
AB De Villiers Advice To Virat Kohli  esakal
IPL

Virat Kohli IPL 2024 : मला आशा आहे की विराट... आरसीबीच्या सततच्या पराभवाने व्यथित डिव्हिलियर्सचा खास दोस्ताला मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IPL 2024 AB De Villiers Advice : आरसीबीसाठी आयपीएलचा 17 वा हंगाम काही खास जात नाहीये. फाफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यातील फक्त एका सामन्यात आरसीबीला विजय मिळवता आला आहे. आता त्यांचा पुढचा सामना हा राजस्थान रॉयल्सविरूद्ध सहा एप्रिलला होणार आहे.

आरसीबी सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. आरसीबीच्या सततच्या पराभवामुळे माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स व्यथित झाला असून त्याने आपला खास दोस्त विराट कोहलीला एक मोलाचा सल्ला दिला.

एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला सामन्याच्या मधल्या षटकांमध्ये खेळपट्टीवर थांबण्याचा सल्ला दिला आहे. डिव्हिलियर्स म्हणतो की फ्रेंचायजीला विराट कोहलीची गरज आहे. तो मधल्या षटकात थांबला तर आरसीबी नक्कीच प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध संतुलन राखण्यात यशस्वी होईल. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 203 धावा केल्या आहेत. तो या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

डिव्हिलियर्सची ही आहे मागणी

विराट कोहली सोडून आरसीबीमध्ये कर्णधार फाफ ड्युप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, रजत पाटीदार हे स्टार फलंदाज आहेत. मात्र विराट सोडून यांच्याकडून म्हणावी तशी कामगिरी होता दिसत नाहीये. यामुळेत डिव्हिलियर्सने किंग कोहलीला 6 ते 15 षटकात क्रीजवर थांबण्याचा सल्ला दिला आहे.

एबी म्हणाला की, 'आशा आहे की तो आपली चांगली सुरूवात कामय राखेल. आरसीबीला मधल्या षटकांवेळी विराट कोहलीची गरज असेल. आम्हाला पहिल्या सहा षटकात त्याची गरज आहे. तो शेवटपर्यंत खेळला पाहिजे. फाफ ड्युप्लेसिसला आता अधिक आक्रमक खेळायला हवं. मात्र विराट कोहलीने 6 ते 15 षटकापर्यंत क्रीजवर उपस्थित असणे गरजेचे आहे. तरच आऱसीबी पूर्णपणे आक्रमक होऊ शकते.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT