PAK vs NZ Abdul Razzaq IPL 2023 esakal
IPL

PAK vs NZ IPL 2023 : यांना NOC कशी काय मिळते.... न्यूझीलंडचा संघ पाहून माजी पाकिस्तानी खेळाडू भडकला

अनिरुद्ध संकपाळ

PAK vs NZ Abdul Razzaq IPL 2023 : भारतात सुरू असलेला आयपीएलचा 16 वा हंगाम आता भरात येत असतानाच शेजारी पाकिस्तानने न्यूझीलंड सोबत टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून तो आजपासून 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र भारतातील आयपीएलमुळे या मालिकेची पुरती पंचाईत झाली. यामुळेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक जाम वैतागला आहे. त्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंवर टीका केली.

भारतात आयपीएल सुरू असल्याने न्यूझीलंडचे अनेक स्टार खेळाडू हे भारतात आहेत. काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या टी 20 मालिकेत न्यूझीलंडचा तगडा संघ उतरणार नाहीये. यामुळे मालिका रंगतदार होईल का नाही याबाबत साशंकता आहे.

हाच मुद्दा पकडून अब्दुल रझाकने जिओ टीव्हीशी बोलताना न्यूझीलंडच्या खेळाडूंवर टीका केली. तो म्हणाला, 'न्यूझीलंड त्यांचा संपूर्ण संघ पाकिस्तानमध्ये पाठवायला हवा होता. त्यांचे काही खेळाडू आयपीएल खेळत आहेत काही दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या मालिकेत जास्त कोणाचा रसच नाही. कसोटी मालिकेत न्यूझीलंडने त्यांचा तगडा संघ पाठवला होता. त्यावेळी सामने उत्कंठावर्धक झाले होते. आताची परिस्थीती पाहता त्यांनी फक्त एक संघ पाकिस्तानमध्ये पाठवला आहे.'

रझाक पुढे म्हणाला, 'मला कळत नाही की या खेळाडूंना राष्ट्रीय संघाचा सामना असतानाही आयपीएल खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र कंस मिळते. ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निकष काय काण तुमची पहिली प्राथमिकता ही राष्ट्रीय संघाला असली पाहिजे.'

सध्या जगभरात आयपीएलची क्रेझ आहे. याचवेळी न्यूझीलंड पाकिस्तानचा दौरा करत आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ 5 टी 20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पाकिस्तानने या मालिकेसाठी आपला तगडा टी 20 संघ उतरवला आहे. यात शाहीन आफ्रिदीचा देखील समावेश आहे. तो आयसीसी टी 20 वर्ल्डकप फायनलनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानकडून मैदानात उतरणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT