MI vs CSK IPL 2023 esakal
IPL

MI vs CSK IPL 2023 : मुंबईची होम ग्राऊंडवरही पाटी कोरीच! CSK ने घरात घुसून केला पराभव

अनिरुद्ध संकपाळ

MI vs CSK IPL 2023 : आयपीएल 2023 मधील मुंबई - चेन्नई पहिली एल क्लासिको चेन्नईने 7 विकेट्स राखून जिंकली. चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत मुंबईला त्यांच्यात मैदानात 157 धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव असून त्यांची गुणांची पाटी अजून कोरीच आहे.

चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 40 धावांची संयमी खेळी करत चेन्नईचा विजय तडीस नेला. त्याला शिवम दुबेने 28 धावांचे तर रायुडूने 20 धावा करून त्याला चांगली साथ दिली.

मुंबईच्या 158 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला पहिल्याच षटकात शुन्यावर पहिला धक्का बसला. बेहरेनडॉर्फने कॉन्वेला शुन्यावर बाद केले. यानंतर मात्र चेन्नईने मुंबईला सामन्यावर पडक मिळवण्याची संधी दिली नाही.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अजिंक्य रहाणेने तुफानी फटकेबाजी करत चौकार आणि षटकारांनीच धावा वसूल करण्यास सुरूवात केली. त्याने चौथ्या षटकात एक षटकार आणि चार चौकार हाणले. त्याने 19 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकत ऋतुराजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची कडक भागीदारी रचली.

अखेर अजिंक्यची ही खेळी पियुष चावलाने आठव्या षटकात 61 धावांवर संपवली. मात्र तोपर्यंत अजिंक्यने सामना मुंबईपासून दूर नेला होता. आता चेन्नईला विजयासाठी बॉल टू रन करण्याची गरज होती.

अजिंक्य बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत चेन्नईला विजयीपथावर नेले. त्याने 40 धावांची नाबाद खेळी करत संघाला 19 व्या षटकात विजय मिळवून दिला. त्याला शिवम दुबेने 28 तर अंबाती रायुडूने 20 धावा करून चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, मुंबईचे महान फलंदाज एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनच्या वाटेवर जात असताना तिलक वर्मा (22), टीम डेव्हिड (31) आणि ऋतिक शौकीन (18) यांनी संघाची लाज वाचवली. मुंबईची अवस्था 7 बाद 113 धावा अशी झाली होती. तरी मुंबईने 20 षटकात 157 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3 तर मिचेल सँटरन आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT