Ambati Rayudu Retirement
Ambati Rayudu Retirement 
IPL

Ambati Rayudu Retirement : धोनी नाही तर रायडू घेणार अखेरचा निरोप!

Kiran Mahanavar

Ambati Rayudu announces retirement from IPL : चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूने आयपीएल 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी निवृत्तीची घोषणा केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या वेळी आयपीएल खेळताना दिसणार असल्याचे त्याने ट्विटरवर जाहीर केले आहे. 2019 मध्ये विश्वचषक संघात निवड न झाल्याने निवृत्त झालेला अंबाती रायडू 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे. या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचा चॅम्पियनही बनवले आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अंबाती रायडूने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. अंबाती रायडूने ट्विटमध्ये लिहिले, 'CSK आणि गुजरात 2 सर्वोत्तम संघ, 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आशेने आज रात्री सहावी. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की आज रात्रीचा आयपीएलमधील हा माझा शेवटचा सामना असेल. मला ही स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. यू-टर्न नाही.'

अंबाती रायुडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रायुडू (अंबाती रायुडू) 2018 पासून CSK कडून खेळत आहे. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 203 सामन्यांत 28.29 च्या सरासरीने 4329 धावा केल्या आहेत. रायुडूने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT