Ambati Rayudu RCB  esakal
IPL

Ambati Rayudu RCB : सीएसके आरसीबीला त्यांची एक ट्रॉफी देऊ शकते जेणेकरून ते... रायुडू असं का म्हणाला?

Ambati Rayudu RCB IPL 2024 : आरसीबीने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. त्यावेळी सीएसकेच्या पराभवाने अंबाती रायुडू फारच भावूक झाला होता.

अनिरुद्ध संकपाळ

Ambati Rayudu RCB IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 4 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीचे पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. आरसीबीने सलग सहा सामने जिंकून प्ले ऑफ गाठली होती.

ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा 27 धावांनी पराभव केला होता. हा सामना आरसीबीला 18 धावांनी जिंकणे गरजेचे होते. तरच ते प्ले ऑफसाठी पात्र होणार होते. आरसीबीने चेन्नईचा पराभव केल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी अन् खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं होतं.

दरम्यान, एलिमिनेटर सामन्यात राजस्थानकडून पराभूत झालेल्या आरसीबीच्या चाहत्यांवर अंबाती रायुडूने बोचरी टीका केली आहे. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलताना रायुडू म्हणाला की, 'जर तुम्ही आरसीबीबाबत बोलत असाल तर फक्त पॅशन आणि सेलिब्रेशन असून तुम्ही ट्रॉफी जिंकू शकत नाही. ट्रॉफी जिंकायला तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल.'

'तुम्हाला जिंकण्याची भूक असायला हवी. तुम्ही फक्त चेन्नईला हरवून आयपीएल ट्रॉफी जिंकाल असा विचार करू नका. आता तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे.'

अंबाती रायुडू सीएसके आणि आरसीबी सामन्यावेळी काय झालं याबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, 'आरसीबीने सीएसकेला मात दिल्यावर ते ट्रॉफी जिंकल्यासारखे सेलिब्रेशन करत होते. बंगळुरूचा प्रत्येक रस्ता हा आरसीबी चाहत्यांनी भरला होता. आता सीएसके आपली एक ट्रॉफी आरसीबीला देऊ शकते. जेणेकरून ते त्याची मिरवणूक काढतील.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Army Attack : बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; सलग दुसऱ्या दिवशी पाच सैनिक ठार

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजन दिवशी चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर माता लक्ष्मी अन् कुबेर देव दोघेही होतील नाराज

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

Kolhapur GST Rate : कोल्हापुरात ‘जीएसटी’ कमी न करताच वस्तूंची विक्री, ग्राहकांची लूट; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

SCROLL FOR NEXT