arjun tendulkar debut ipl rohit sharma statement 
IPL

MI च्या अखेरचा सामन्यात खेळणार 'अर्जून', कॅप्टन रोहितने दिले संकेत

अर्जुन तेंडुलकर कधी पदार्पण करणार यांची सर्व चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Kiran Mahanavar

MI vs SRH IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या काल अतिशय रोमांचक असा समाना झाला. हैदराबादने सामन्यात मुंबईचा 3 धावांनी पराभव केला. प्लेऑफमधून बाहेर पडलेली मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी दिली. हैदराबाद विरुद्ध मुंबईचा संघ दोन युवा खेळाडूंसह मैदानात उतरला होता. पण त्यात अर्जुन तेंडुलकरला खेळवण्यात आलं नाही. अर्जुन कधी पदार्पण करणार यांची सर्व चाहत्यांना प्रतीक्षा आहे.(Arjun Tendulkar Debut IPL Rohit Sharma Statement)

अर्जुन तेंडुलकर खेळणार का नाही ? यावर कर्णधार रोहित शर्माने मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुन आपल्याला खेळताणा दिसू शकतो. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या नाणेफेक दरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही सतत नवीन खेळाडूंना संधी देणार ​​आहे, ज्यामुळे पुढील हंगामासाठी आम्हांला काही गोष्टी स्पष्ट होतील. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव यांना संधी दिले. असच शेवटच्या सामन्यातही काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.

अर्जुन तेंडुलकर रोहितच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर ट्रेंड करू लागला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुन नक्की खेळणार असा अंदाज लावल्या जात आहे. मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते.

मुंबई इंडियन्सने गेल्या हंगामातही अर्जुनला २० लाख रुपयांना खरेदी केले होते, पण त्याला एकही सामना खेळावला नव्हता, आणि या हंगामातही तसेच घडले आहे. मुंबई इंडियन्सने मात्र अर्जुन तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट केला आहे. असे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT