IPL 2020 Arjun Tendulkar News Sakal
IPL

MI ची चाहत्यांना गूगली! Arjun Tendulkar बाकावरच!

सकाळ डिजिटल टीम

IPL 2020 Arjun Tendulkar News : लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulka) पदार्पणाची संधी देण्याचा विचार करत असल्याचे ट्विट मुंबई इंडियन्सने केले होते. यावर सचिन तेंडुलकरची लेक आणि अर्जुनची बहिणी सारा तेंडुलकरने येलो हर्टवाल्या इमोजीसह रिप्लायही दिला होता. पण मुंबई इंडिन्यसचे हे ट्विट एखाद्या गूगली चेंडू सारखे फसवे निघाले. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नव्या भिडूला संधी दिली. पण ती अर्जुन तेंडुलकरला नाही तर कॅरेबियन फॅबिन एलेन या क्रिकेटला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना गूगलीच टाकलीये असे म्हणावे लागेल.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर अर्जुन तेंडुलकर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाल्याचे स्पष्ट होईल, असा अंदाज मुंबई इंडियन्सच्या ट्विटटवरुन लावण्यात आला होता. पण हे चित्र काही पाहायला मिळाले नाही. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ एका बदलासह मैदानात उतरला. कॅरेबियन फॅबिन एलिन याला संधी देण्यात आली. कायरेन पोलार्डच्याकडून त्याने कॅप स्विकारली. अर्जुन तेंडुलकरची पदार्पणाची प्रतिक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आयपीएलच्या मागील काही सामन्यांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसतोय.

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला स्पर्धेत सलग पाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. बॉलिंग युनिटमधील उणीव आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि कायरेन पोलार्डची खराब कामगिरी संघाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरासाठी मूळ किंमतीच्या दुप्पट 40 लाख रुपये मोजून ताफ्यात घेतलं. तो डावखुरा गोलंदाज आहे. पूर्वीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील गोलंदाजी एवढी भक्कम वाटत नाही. त्यामुळे अर्जुनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. एका बाजून दक्षिण आफ्रिकेच्या युवा डेवॉड ब्रेविसला सातत्याने संधी मिळत असताना अर्जुनला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT