arshdeep singh saka
IPL

सायकल मोडली म्हणून ४० किलोमीटर पायी जायचा, भारतीय संघात झालीय निवड

मोठ्या संघर्षांनंतर भारतीय संघात जागा मिळाल्याने अर्शदीप सिंहचं कौतुक केलं जात आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Arshdeep Singh IPL 2022: दक्षिण आफ्रिका आणि भारत मध्ये येत्या ९ जून पासून टी-२० सिरीज सुरु होत आहे. पाच सामन्यांच्या या सीरिजसाठी नुकताच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या या सीरिजमध्ये संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.

संघात केएल राहुल बरोबरच हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, हर्षल पटेल, श्रेयस अय्यर या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. दरम्यान या दिग्गज खेळाडूंबरोबर यावेळी संघात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या दोन नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. ज्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. मोठ्या संघर्षांनंतर भारतीय संघात जागा मिळाल्याने अर्शदीप सिंहचं कौतुक केलं जात आहे.

चंदीगड अकॅडमीत ट्रेनिंग घेतलेल्या अर्शदीपचे वडील एक सुरक्षा अधिकारी आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अर्शदीपची आई बलजीत कौरने आपल्या मुलाच्या यशाबद्दल बोलताना भावुक झाल्या. त्यांनी सांगितलं कि, अर्शदीपच्या वडिलांनी त्याला एकदा खरडच्या पार्कमध्ये बॉलिंग करताना पाहिलं. आपल्या मुलाची बॉलिंग पाहून त्यांनी त्याला चंदीगड येथील कोच जसवंत राय यांच्याकडे घेऊन गेले आणि तिथूनच त्याच्या क्रिकेट करियरला सुरुवात झाली.

बलजीत कौर सांगतात कि, चंदीगडच्या क्रिकेट अकॅडमीत ट्रेनिंग घेण्यासाठी त्याला अर्शदीपला दिवसातून दोन वेळा खरड ते चंदीगड असा सायकल प्रवास करावा लागायचा. हे अंतर जवळपास २० किलोमीटर आहे.

अर्शदीपचे कोच जसवंत राय यांनी सांगितले कि, अर्शदीप जेव्हा अकॅडमीत आला तेव्हा त्यांच्या बॉल स्विंग करण्याच्या स्टाईलने मी इम्प्रेस झालो होतो. एका ओव्हरमध्ये सगळे सहा बॉल तो वेगवेगळ्या स्टाईलने फेकण्याचा प्रयत्न करायचा. एका किस्स्याची आठवण करून देताना जसवंत यांनी सांगितले कि, एकदा अर्शदीपला अकॅडमीत यायला उशीर झाला होता. ट्रेनिंग संपल्यानंतर मी पाहिलं कि, पार्किंगमध्ये त्याची सायकल सुद्धा नव्हती. तेव्हा मी अर्शदीपला विचारलं तर त्यानं सांगितलं त्याची सायकल तुटली, म्हणून तो ट्रेनिंगसाठी पायी आला होता. क्रिकेटसाठी अर्शदीपच्या या संघर्षाचं मोठं कौतुक केलं जात आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये अर्शदीप पंजाब संघाकडून खेळताना पाहायला मिळाला. ज्यात त्याच्या जबरदस्त बॉलिंगने दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने सुद्धा त्याची पाठ थोपटवली होती. सेहवागने अर्शदीपचं कौतुक करताना म्हंटल कि, भलेही त्यानं जास्त विकेट घेतल्या नसतील, पण डेथ ओव्हर्समध्ये त्याने जबरदस्त बॉलिंग केली आहे. सिंगने १४ सामन्यांत ३८.५० च्या सरासरीने आणि ७.७० च्या इकॉनॉमीने १० विकेट आपल्या नावे केल्या.

अर्शदीपच्या आई बलजीत कौर यांनी म्हंटल कि, तो मला प्रत्येक मॅचच्या आधी फोन करतो. रविवारी संध्याकाळी त्याचा मला फोन आला आणि म्हंटला, आई भारतीय संघात माझी निवड झाली आहे. अर्शदीपच्या या बातमीनंतर बलजीत यांचे आनंदाश्रू थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT