WPL BCCI IPL  esakal
IPL

WPL BCCI IPL : WPL वर्षाअखेरपर्यंत स्थगित करणार? आयपीएल सुरू असतानाच BCCI लागली मोठ्या तयारीला

अनिरुद्ध संकपाळ

WPL BCCI IPL : आयपीएलचा 16 वा हंगाम अजून मध्यापर्यंत येण्यापूर्वीच बीसीसीआय वुमन्स प्रीमियर लीगबाबत मोठ्या तयारीला लागली आहे. महिला प्रीमियरल लीगचा पुढा हंगाम हा फेब्रुवारी महिन्यात खेळला जाईल. मात्र हा हंगाम आयपीएलप्रमाणे होम अवे असा खेळवला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयमधील एका सूत्राने ही माहिती दिली. WPL चा पहिला हंगाम मुंबईच्या दोन स्टेडियमवर खेळला गेला होता.

या महिन्यात आयपीएल चेअरमन अरूण धुमल यांनी WPL च्या पुढच्या तीन हंगामासाठी पाच संघातच सामने होतील. हे सामने होम आणि अवे अशा स्वरूपात होणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की WPL चे सामने टीयर 2 शहरात घेऊन जाणे अवघड आहे. कारण या शहरांच्या नावाने WPL मध्ये कोणता संघ नाही. आम्ही WPL या वर्षाच्या शेवटापर्यंत स्थगित करण्याचा देखील विचार करत होते. जेणेकरून WPL दिवळीमध्ये आयोजित करता येईल. मात्र या बाबत अजून काही ठरलेलं नाही. कारण भारत - पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकप स्थळ आणि आशिया कपच्या स्थानाबाबत अजून चर्चा सुरू आहेत.

बीसीसीआय आशिया कप 2023 मध्ये सहभागी होण्याबाबत तसेत वर्ल्डकपदरम्यान पाकिस्तान भारतात सामने खेळण्याबाबत सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहे. याबाबत सर्व सदस्य चर्चा त-करत आहेत. या विषयाबाबत अंतिम निर्णय आल्यानंतरच स्पष्टता निर्माण होईल. यापूर्वी वर्ल्डकपमधील पाकिस्तानचे जवळपास सर्व सामने हे चेन्नई आणि कोलकात्यात होतील अशी चर्चा होती. कारण इथेच पाकिस्तान संघाला जास्त सुरक्षित वाटते.

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT