RR vs CSK  
IPL

RR vs CSK : संजू सॅमसन हट्टी; चाहत्यानं लाख सांगूनही उचलला फोन अन्...VIDEO व्हायरल

संजूने फोनवरुन चक्क चाहत्यासोबत संवाद साधला

धनश्री ओतारी

राजस्थान रॉयल्स संघाने सीएसकेवर दुसऱ्यांदा विजय मिळवत गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये संजूने फोनवरुन चक्क चाहत्यासोबत संवाद साधला आहे. (Bhaiya Kya Haal Hai Sanju Samson Answers Call On Fan Phone While Clicking Selfie Video Viral)

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये सीएसके संघाचा 32 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर संजू चाहत्यांच्या घोळक्यात दिसला. व्हायर होणाऱ्या व्हिडीओमध्ये संजू स्टँड्समध्ये असणाऱ्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

सीमारेषेनजीक असणाऱ्या एका जाळीच्या बाहेर असणारे क्रिकेटप्रेमी संजूसोबत संवाद साधत आहेत. दरम्यान, सेल्फी घेत असताना अचानक फोन वाजतो. हा फोन गर्दीतल्याच एका चाहत्याच्या होता.

यावेळी सेल्फी घेण्यात व्यत्यय येत असल्यामुळं फोन उचलू नका, कट करा... असं चाहते त्याला सांगत होते. पण, संजूनं चाहत्यांचे न ऐकता फोन उचलला. तितक्यातच ज्या व्यक्तीचा फोन होता, त्यानं समोरच्या व्यक्तीला 'संजू भैया बोल रहे हैं....बोलो संजू भैया' असं म्हणत संजूकडे विनंती केली. चाहत्याची ही विनंती ऐकल्यानंतर संजूनंही फोन उचलला आणि 'हां भैया क्या हाल है...?' असा प्रश्न त्यानं इथून विचारला.

संजूचा हा आपलेपणा पाहताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. संजूचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी मैदनातच कल्ला सुरु केला.

राजस्थानच्या संघानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच विशेष कॅप्शनदेखील दिली आहे. 'मेसेज करण्यापेक्षा फोनच करा... कोण जाणे संजू सॅमसनच तुमचा फोन उचलेल', असं कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.

राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलचे टॉपर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 202 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैसवालने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर कोणालाही 200 धावाचा टप्पा पार करता आला नव्हता तो राजस्थानने संजू सॅमसनच्या 200 व्या सामन्यात पार केला. राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT