Chennai Super Kings Vs Sunrisers Hyderabad IPL 2024  esakal
IPL

CSK vs SRH IPL 2024 : हंगामातील दोन हेवी वेट चॅम्पियन भिडणार; सीएसके डबल डिजीटमध्ये जाणार की हैदराबाद दुसरं स्थान पटकावणार?

अनिरुद्ध संकपाळ

Chennai Super Kings Vs Sunrisers Hyderabad IPL 2024 : सलग दोन पराभवांमुळे पाचव्या स्थानावर घसरण झालेल्या गतविजेत्या चेन्नई संघाला यंदाच्या आयपीएलमधील आपले भवितव्य कायम राखायचे असेल तर उद्या हैदराबाद संघाविरुद्ध विजयी मार्गावर येणे आवश्यक आहे; पण हैदराबाद संघाची सध्याची झंझावाती फलंदाजी पाहता चेन्नईसाठी ही लढत सोपी नसेल.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नईने या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात करून पहिल्या चार संघात आपले स्थान कायम ठेवले होते; परंतु लखनौविरुद्ध सलग दोन पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे त्यांची पीछेहाट झालीच, त्याचबरोबर आत्मविश्वासही काहीसा कमजोर झाला आहे.

चिदंबरम स्टेडियम काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात चेन्नईने २१० धावांपर्यंत मजल मारली होती; परंतु मार्कस स्टॉयनिसचा झंझावात त्यांना रोखता आला नाही. परिणामी, पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबाद संघात स्टॉयनिसपेक्षाही तुफान टोलेबाजी करू शकतील, असे एकापेक्षा एक आक्रमक फलंदाज आहेत. या स्पर्धेत हैदराबाद संघाने तीनदा अडीचशे पार धावा केलेल्या आहेत. यातील दोन धावसंख्या तर सर्वाधिक ठरलेल्या आहेत; पण हैदराबादचा हाच संघ बंगळूरविरुद्ध द्विशतकाच्या आतील धावा पार करू शकला नव्हता. हीच बाब चेन्नई संघाला उमेद देणारी आहे.

चेन्नईकडे स्वतः कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे असे दोन खंदे फलंदाज आहे. ऋतुराजने तर स्पर्धेतले दुसरे शतक केले आहे आणि दुबे त्यांच्यासाठी मॅचविनर आहे. साधारणतः अखेरच्या काही चेंडूंसाठी फलंदाजीस येणारा महेंद्रसिंग धोनी मोलाची भर घालत आहे;

परंतु हा अपवाद वगळता चेन्नईचे इतर फलंदाज निराशा करत आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाला बढती देण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. राचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांचे अपयश चेन्नई संघासाठी चिंता करणारे आहे.

दव निर्णायक ठरणार

लखनौविरुद्धच्या सामन्यात २१० धावांचे संरक्षण करताना चेन्नई संघाला दवाचा फटका बसला होता. त्या दिवशी अधिक प्रमाणात दव मैदानावर पडले होते. उद्याही अशीच परिस्थिती असेल तर नाणेफेकीला अधिक महत्त्व असेल.

बंगळूरकडून झालेल्या पराभवामुळे हैदराबाद संघ आता नव्याने फलंदाजीच्या पवित्र्याचा विचार करू शकेल; पण ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा कोणत्याही परिस्थितीत आपला गिअर बदलणार नाही. जम बसला तर त्यांच्यासमोर कोणतीही गोलंदाजी फिकी पडू शकते.

पॅट कमिंसमुळे हैदराबादच्या गोलंदाजीची धार वाढलेली आहे, मात्र त्यांचे इतर गोलंदाज तितकेसे प्रभावी नाहीत, म्हणूनच मुंबई इंडियन्स आणि बंगळूर संघाने त्यांच्याविरुद्धच्या अगोदरच्या सामन्यांत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT