IPL

Ajinkya Rahane CSK : उपकर्णधार पदाचा.. अनसोल्डचा.. सबका बदला लेगा ये अजिंक्य; हा हा म्हणता ठोकले हंगामातील वेगवान अर्धशतक

अनिरुद्ध संकपाळ

Ajinkya Rahane CSK : भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला नुकतेच बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते. आधी त्याचे उपकर्णधारपद गेले होते. त्यानंतर त्याला कसोटी संघातील स्थान गमवावे लागेले होते. इतकेच काय तर आयपीएलच्या लिलावात अनसोल्डचा शिक्काही बसला. मात्र या पठ्ठ्याने संधी मिळताच आपले सगळे हिशेब चुकते केले.

सीएसकेकडून आपली नवी आयपीएल इनिंग सुरू करणाऱ्या अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतकी खेळी करत हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. यापूर्वी ही कामगिरी जॉस बटलर आणि ऋतुराज गायकवाड यांनी केली होती. त्यांनी 20 चेंडूत हा कारनामा केला होता. मात्र अजिंक्यने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 19 चेंडूतच अर्धशतकी धमाका केला.

मुंबई इंडियन्सच्या बेहरेनडॉर्फने पहिल्याच षटकात डेवॉन कॉन्वेला बाद करत सीएसकेला पहिला धक्का दिला होता. शुन्यावर पहिली विकेट गमावल्यानंतर हा सामना टाईट होणार असे वाटत होते. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने बघता बघता मुंबईचीच हवा टाईट केली. अजिंक्य रहाणेने चौथ्या षटकात 6, 4, 4, 4, 4 असे तडाखे देत दमदार सुरूवात केली.

अजिंक्यने 19 षटकात अर्धशतकी मजल मारली होती. त्याने ऋतुराज गायकवाडसोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. यात अजिंक्य रहाणे 27 चेंडूत 61 धावांचा वाटा होता. मात्र ही तुफानी खेळी पियुष चावलाने संपवली. रहाणेने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटाकर मारले.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT