CSK Share Devon Conway Marriage Photo  ESAKAL
IPL

डेव्हिड कॉनव्हॉयने बांधली लग्नगाठ; CSK ने शेअर केला खास फोटो

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनव्हॉयने (Devon Conway) आपली गर्लफ्रेड किमशी लग्नगाठ (Marriage) बांधली आहे. मुळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेला मात्र न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या डेव्हॉन कॉनव्हॉय काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या बायोबबलमधून बाहेर पडला होता. त्याने आपली मातृभूमी दक्षिण आफ्रिकेत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत कॉनव्हॉय सुटाबुटात टाय घालून उभा आहे. तर त्याची पत्नी किम वॉट्सन (Devon Conway Wife Kim Watson) ही पारंपरिक वेडिंग गाऊन घालून उभी आहे. माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार कॉनव्हॉय आणि किम हे एकमेकांना गेल्या तीन वर्षापासून डेट करत होते. त्यानंतर आता त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जने कॉनव्हॉयसाठी एक पारंपरिक प्री वेडिंग बॅश देखील आयोजित केला होता. त्यानंतर डेव्हिड कॉनव्हॉयने आयपीएलचा बायो बबल सोडला होता.

चेन्नई सुपर किंग्जने डेव्हॉन कॉनव्हॉयच्या लग्नाचा फोटो शेअर करून त्याला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चेन्नईने ट्विट केले की, 'आम्ही तुम्हाला पती आणि पत्नी घोषित करत आहोत. किम आणि कॉनव्हॉयसाठी #WeddingWhistles (लग्नाची शिट्टी). डेव्हॉन कॉनव्हॉय हा पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यासाठी सीएसकेसाठी उपलब्ध असणार नाही. तो परतल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार त्याला तीन दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT