Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match esakal
IPL

Kolhapur : रोहित शर्मा आऊट होताच CSK च्या चाहत्यानं चिडवलं अन् मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी त्याचं डोकंच फोडलं

रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर चिडवल्याच्या रागातून बंडोपंत बापू तिबिले यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल सामने सुरू होताच यातील संघांचे समर्थक आपापल्या संघांचा उदोउदो सुरू करतात. घरोघरी, गल्लीमध्ये यावरून चर्चा रंगतात. यापूर्वीही संघांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडले आहेत.

कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यादरम्यान (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match) रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर चिडवल्याच्या रागातून बंडोपंत बापू तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोक्यात लाकडी फळी घातल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यांच्या जखमेवर सात टाके बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले. करवीर पोलिसांनी (Karveer Police) या प्रकरणी बळवंत महादेव झांजगे (वय ५०) व सागर सदाशिव झांजगे (३५, दोघे रा. हणमंतवाडी) या दोघांना अटक केली आहे.

बुधवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यात सामना सुरू होता. प्रथम फलंदाजीत हैदराबादने २७७ धावा केल्या. हे लक्ष्य मुंबईला पेलवणार का यावरून सर्वांनाच औत्सुक्य होते. हणमंतवाडीतील बळवंत झांजगे, सागर झांजगे मुंबई संघाचे समर्थन करत होते. याच ठिकाणी बंडोपंत तिबिलेही सामना पाहत होते. उत्तरादाखल खेळण्यास आलेल्या मुंबईचा रोहित शर्मा बाद होताच तिबिले यांनी मुंबई समर्थकांना डिवचले.

या रागातून बळवंत झांजगे यांनी काठीने तिबिले यांना मारहाण केली. सागर झांजगे याने लाकडी फळी तिबिले यांच्या डोक्यात घातल्याने ते रक्तबंबाळ झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. करवीर पोलिसांनी दोघा संशयितांना बुधवारी रात्रीच अटक केली. दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

तरुणाईने विचार करण्याची गरज

आयपीएल सामने सुरू होताच यातील संघांचे समर्थक आपापल्या संघांचा उदोउदो सुरू करतात. घरोघरी, गल्लीमध्ये यावरून चर्चा रंगतात. यापूर्वीही संघांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडले आहेत. या कारणांनी जवळचे मित्रही दुरावल्याची उदाहरणे आहेत. अशा कारणांसाठी कितपत ताकद खर्ची घालावी, याचा विचार तरुणाईने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT