IPL

IPL 2021: विराट कोहलीबद्दल डेल स्टेनचं महत्त्वाचं वक्तव्य

विराज भागवत

वाचा, नक्की काय म्हणाला आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज

IPL 2021 in UAE: विराट कोहलीच्या RCBची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक हंगामात बंगळुरू संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पण यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा संघ दमदार कामगिरी करत आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात विराटचा संघ कोलकाताकडून मोठ्या फरकाने पराभूत झाला होता. पण, नंतर मात्र विराटने दमदार कमबॅक केला. विराटने गेल्या दोन सामन्यात अर्धशतकेही ठोकली आणि दोन मोठ्या संघांना पराभूत केले. विराटसेनेने आधी चेन्नईला पराभूत केले तर नंतर मुंबईचा धूळ चारली. दमदार कामगिरी करणाऱ्या विराटकडून त्याच्या संघातील खेळाडूंना काय अपेक्षित असावं, याबद्दलचं मत माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने व्यक्त केलं.

"विराटबद्दल मला असं वाटतं की त्याचा आक्रमकपणा हा खेळाडूंना भावणारा आहे. विराटने नेहमीच आक्रमक असावं असं त्याच्या सहकाऱ्यांना वाटतं. तो खेळताना खूप चांगला वाटत असला तरी त्याचा मैदानावरील खेळण्याचा स्वभाव आक्रमक असणं संघासाठी फायद्याचा आहे. तो अनेक तरूण खेळाडूंचा आदर्श आहे. त्याच्याकडे अनेक खेळाडू पाहतात, अनुकरण करत असतात. विराटबद्दल अनेकांना प्रचंड आदर आहे. ते विराटने सांगितलेल्या गोष्टी नक्कीच ऐकतात", असं मत डेल स्टेनने व्यक्त केलं.

दरम्यान, बंगळुरूच्या संघाने मुंबईविरूद्ध २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. विराटने ४२ चेंडूत केलेल्या ५१ धावा आणि मॅक्सवेलने ३७ चेंडूत कुटलेल्या ५६ धावांच्या जोरावर बंगळुरूने ही मजल मारली. श्रीकर भरतनेही २४ चेंडूत ३२ धावा केल्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी केली. मुंबईने 'पॉवर प्ले'च्या षटकात बिनबाद अर्धशतकी मजल मारली होती. कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूत ४३ धावांची आतषबाजी केली होती. पण तो बाद झाला आणि मुंबईच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. बिनबाद ५७ वरून मुंबईचा संघ १११ धावांवर पूर्ण बाद झाला. या लाजिरवाण्या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT