IPL

Daniel Vettori : शांत, संयमी पडद्यामागचा कलाकार; व्हिटोरीचा एक निर्णय अन् हैदराबादचं नशीब पालटलं

Daniel Vettori IPL 2024 : सनराईजर्स हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक डॅनिएल व्हिटोरीच्या एका निर्णयामुळं हैदराबादचा मोठा फायदा झाला.

अनिरुद्ध संकपाळ

Daniel Vettori SRH vs RR IPL 2024 : सनराईजर्स हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 ची फायनल गाठली. जरी हैदराबादने सामना तब्बल 36 धावांची जिंकला असला तरी सामन्यात एक वेळ अशी होती की हैदराबाद अडचणीत सापडला होता. त्यामुळं हैदराबादला फलंदाजी करतानाच इम्पॅक्ट प्लेअर मैदानावर उतरवावा लागला.

हैदराबादने धावांची नितांत गरज असताना शाहबाज अहमद या अष्टपैलू खेळाडूला मैदनात उतरवलं. त्याला फलंदाजीत काही फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानं स्लॉग ओव्हरमध्ये 18 चेंडूत 18 धावा केल्या. यावेळी हैदराबादनं ट्रिक मिस केली असं वाटू लागलं.

मात्र जशी हैदराबादची गोलंदाजी सुरू झाली याच इम्पॅक्ट प्लेअरनं आपला इम्पॅक्ट दाखवला. त्यानं राजस्थानचे तीन फलंदाज गार करत हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.

दरम्यान, पॅट कमिन्सला सामन्यानंतर शाहबाजला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदनात उतरवण्याचा निर्णय कोणाचा होता असं विचारण्यात आल्यावर त्यानं हेड कोच डॅनिएल व्हिटोरीचं नाव घेतलं. त्यानं हे नाव घेताच सर्वांचे कान टवकारले. कारण न्यूझीलंडचा एकेकाळचा दिग्गज डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू असलेल्या व्हिटोरीने दूरदृष्टी ठेवून आपल्या सारख्येच अष्टपैलूत्व असलेल्या शाहबाजला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवलं.

व्हिटोरीने फक्त फलंदाजीतील त्याची उपयुक्तता हेरली नाही तर तो नंतर गोलंदाजीत किती मोठं योगदान देऊ शकतो हे देखील हेरलं. शाहबाज अहमदनं देखील आपल्या कोचला निराश केलं नाही. व्हिटोरीने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात जास्तीजास्त डावखुरे फिरकी गोलंदाज वापरण्याचा सल्ला कमिन्सला दिला होता. त्याप्रमाणं अभिषेक शर्माने देखील गोलंदाजी केली अन् हेटमायर अन् संजू सॅमसन हे दोन मोठे मासे गळाला लावले.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT