Deepak Chahar Hamstring Injury hurts CSK  esakal
IPL

दुखापत दीपकला, वेदना मात्र सीएसकेच्या वाढणार?

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने विंडीजचा 17 धावांनी पराभव केला. भारताने वनडे पाठोपाठ टी 20 मालिकेत देखील व्हाईट वॉश दिला. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताला एक धक्का देखील बसला. भारताचा वेगवानी गोलंदाज दीपक चहरच्या (Deepak Chahar) मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र दीपकच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) देखील टेन्शन वाढणार आहे.

दीपक चहर वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात चांगल्या लयी दिसत होता. त्याने सुरूवातीलाच विंडीजला दोन धक्के दिले होते. मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकत असताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आणि त्याला मैदान सोडावे लागले. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने त्याची दुखापत किती गंभीर आहे याची पहाणी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

जर त्याचे हॅमस्ट्रिंग टिअर (Hamstring Tear) झाले असेल तर त्याला आयपीएलचे (IPL 2022) सुरूवातीचे काही सामने देखील खेळात येणार नाहीत. चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याला यंदाच्या हंगामात 14 कोटी (14 Crore) रूपयांना पुन्हा विकत घेतले आहे. ग्रेड वन चे टिअर असले तर त्यातून सावरण्यासाठी जवळपास 6 आठवड्यांचा कालावधी लागतो. सध्या तरी दीपक चहर येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT