delhi capitals team member tests covid 19 positive SAKAL
IPL

दिल्लीचा पाय आणखी खोलात; CSK सोबतच्या सामन्याआधीच संघाला झटका...

सामन्यापूर्वी दिल्लीसाठी एक वाईट बातमी संघाचा नेट बॉलर कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ ऑनलाईन टीम

CSK vs DC Today IPL Match: आयपीएलच्या 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आज संध्याकाळी खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी दिल्ली संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर कोरोना पॉझिटिव्ह (Delhi Capitals Net Bowler Testing Positive) आला आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022 साठी तयार केलेल्या कोरोना प्रोटोकॉलनुसार, दिल्ली कॅपिटल्सला कोरोना चाचणीच्या दुसर्‍या फेरीतून जावे लागणार आहे. तोपर्यंत सर्व खेळाडू खोल्यांमध्ये एकटे राहतील.

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सच्या नेट बॉलरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. टीम हॉटेल रूममध्ये त्याच्यासोबत राहिलेल्या गोलंदाजालाही होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या 10 पैकी 5 विजय आणि 5 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर आहे. डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचाही यापूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पाँटिंगला काही सामन्यांना मुकावे लागले होते. याशिवाय परदेशी खेळाडूंमध्ये टिम सेफर्ट, मिचेल मार्श आणि सपोर्ट स्टाफच्या ४ सदस्यांनाही गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. टीममध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाणही बदलण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sydney Beach Shooting : किंकाळ्या अन् जीव वाचवण्याची धडपड! सिडनीतील गोळीबाराचा थरकाप उडवणारा VIDEO समोर...

"मी त्यांना सांगितलं बारा तासांच्या वर.." कामाच्या वेळेबाबत जेव्हा मयुरीने घेतला ठाम निर्णय, म्हणाली..

Dhurandhar Video : 'धुरंधर' 300 कोटी पार! पण रहमान डकैतच्या रोलमध्ये शाहरुख खान असता तर...व्हायरल AI व्हिडिओ पाहून चाहते शॉक

Latest Marathi News Live Update: सोलापुरच्या बेडर पूल-नानीपार्क रस्त्याची भयानक दुरावस्था

Mumbai News: जळीत रुग्णांसाठी केईएमचा मोठा आरोग्यविषयक टप्पा! नवीन उपचार केंद्राचे लोकार्पण; काय सुविधा मिळणार?

SCROLL FOR NEXT