Gujarat Titans Release Anthem Song esakal
IPL

VIDEO: 'आवा दे' म्हणत गुजरात टायटन्सने केले ANTHEM रिलीज

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) सुरू होण्यास काही तासत शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, यंदाच्या हंगामातील नवखा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपले अँथम साँग (Anthem Song) आज रिलीज केले. डब शर्माचे गीत आणि गुजराती लोक कलाकार आदित्य गढवी यांचा आवाज या आवा दे अँथम साँगला लाभला आहे. या साँग द्वारे गुजराती संस्कृती आणि संघाच्या महत्वकांक्षा लोकासमोर ठेवण्यात आल्या आहे. या अँथम साँगची सुरूवात ही प्रसिद्ध कवी नर्मद यांच्या जय जय गरवी गुजरात ने होते.

गुजरात टायटन्सचे अँथम साँग (Gujarat Titans Anthem Song) तयार करणाऱ्या लोकांना विश्वास आहे की हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले. गुजराती लोक कलाकार आदित्य गढवी यांनी सांगितले की, 'गुजरात टायटन्ससाठी हे गाणे गायचे होते त्यावेळी या माध्यामातून गुजरातची उर्जा, चारित्र्य आणि ओळख लोकांपर्यंत पोहचवता येईल असे मला वाटले. मी एक धुन निवडली ही धुन राज्याची ओळख जगासमोर आणेल अशी आशा होती. गुजारात टायटन्समधील सर्वांना हे अँथम साँग आवडल्याचा मला आनंद आहे. ज्यावेळी मैदानात संघ खेळेल त्यावेळी हे अँथम साँगचा आवाज मैदानात घुमू लागले. यामुळे गजरात टायटन्सच्या संघात उत्साह येईल.'

गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर हे अँथम साँग लाँच केल्या केल्या यावर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. या गाण्याला काही मिनिटातच हजारो लोकांनी आपली पसंती दिली आहे. गुजारात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. यंदाच्या हंगामात 8 ऐवजी 10 संघांचा समावेश असणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट हे दोन नवे संघ यंदा जुन्या आठ संघांना आव्हान देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT