GT vs RCB IPL 2024  esakal
IPL

GT vs RCB IPL 2024 : बंगळूर-गुजरात सामन्यात कोणाची सरशी होणार?

अनिरुद्ध संकपाळ

Gujarat Titans Vs Royal Challengers Bengaluru IPL 2024 : बरोबर महिन्यानंतर स्पर्धेतला दुसरा विजय मिळवणाऱ्या बंगळूर संघाचा आत्मविश्वास काहीसा उंचावलेला आहे. त्याचा उपयोग उद्या गुजरातविरुद्ध होणाऱ्या लढतीत कसा केला जातो यावर त्यांच्या अंधुक आशा अवलंबून असतील.

नऊ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवणारा बंगळूरचा संघ १० संघांत १० व्या स्थानावर आहे. उर्वरित पाचही सामने जिंकले तरी त्यांना प्ले-ऑफ गाठणे कठीणच आहे. मात्र प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे.

बंगळूरसाठी त्यांची गोलंदाजी चिंतेचा विषय आहे, मात्र याच गोलंदाजांनी कमाल केली आणि विक्रमी धावसंख्या रचत असलेल्या हैदराबाद संघाला पराभूत केले होते, उद्याच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी गुजरातची फलंदाजीही तेवढी भरवशाची नाही. त्यामुळे बंगळूरच्या आशा कायम असतील.

सर्वाधिक धावा करून विराट कोहली ऑरेंज कॅप स्वतःकडे सन्मानाने कायम ठेऊन आहे; परंतु त्याचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय आहे. पॉवर प्लेमधील क्षेत्ररक्षण मर्यादेचा फायदा घेऊन कोहली आक्रमक फलंदाजी करतो, पण त्यानंतर त्याला आक्रमक टोलेबाजी करणे कठीण जात आहे.

गुजरातसाठी मोहित शर्मा हा त्यांचा हुकमी मध्यमगती गोलंदाज आहे. हळूवार चेंडूवर तो अनेक फलंदाजांना कोंडीत पकडत आहे; परंतु गेल्या सामन्यात दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंतने त्याच्या अखेरच्या षटकांत ३० धावा चोपून मोहितचा आत्मविश्वास कमजोर केलेला आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाज रशीद खानला पुन्हा एकदा गुजरातच्या गोलंदाजीची धुरा वाहावी लागणार आहे.

गुजरातचा संघ चार विजयांसह सातव्या स्थानावर आहे. प्ले-ऑफसाठी त्यांनाही उर्वरित सर्व सामन्यांत विजय आवश्यक आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT