LSG vs GT IPL 2023 Hardik Pandya  esakal
IPL

LSG vs GT Hardik Pandya : अखेर पांड्याने गिअर बदलला अन् गुजरातचा जीव भांड्यात पडला

अनिरुद्ध संकपाळ

LSG vs GT IPL 2023 Hardik Pandya : लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार हार्दिक पांड्याने 50 चेंडूत 66 धावांची दमदार खेळी केली. तर सलामीवीर वृद्धीमान साहाने 47 धावा करत मोलाचे योगदान दिले. मात्र साहा आणि पांड्याने चांगली सुरूवात करून देखील मधल्या षटकांमध्ये गुजरातची गाडी अडली होती. त्यांना 16 षटके झाली तरी शतक पार करता आले नाही. अखेर हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलला आणि गुजरातचा जीव भांड्यात पडला.

लखनौ सुपर जायंट्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज क्रुणाल पांड्याने दुसऱ्याच षटकात गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर वृद्धीमान साहा आणि हार्दिक पांड्याने गुजरातला आक्रमक सुरूवात करून दिली. यात साहाचा मोठा वाटा होता. त्यांनी पॉवर प्लेमध्ये गुजरातला 39 धावांपर्यंत पोहचवले. यात 34 धावांचे योगदान एकट्या वृद्धीमान साहाचे होते.

पॉवर प्लेमध्ये वृद्धीमान साहाने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलला. त्याने साहासोबतची भागीदारी अर्धशतक पार पोहचवत संघाला 10 षटकात 70 धावांचा टप्पा पार करून दिला. वृद्धीमान साहाला कृणाल पांड्याने 47 धावांवर बाद केले. साहाचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. पांड्याने साहा आणि हार्दिकची दुसऱ्या विकेटसाठीची 68 धावांची भागीदारी तोडत आपली दुसरी शिकार केली.

वृद्धीमान साहा 47 धावांवर बाद झाल्यानंतर आलेला अभिनव मनोहर 3 धावांची भर घालून परतला. त्याला अमित मिश्राने बाद केले. तर नवीन उल हकने विजय शंकरला 10 धावांवर बाद केले. दरम्यान, गुजरातची धावगती देखील मंदावली. 16 षटके झाली तरी गुजरातला शंभरी पारी करता आली नव्हती. हार्दिक पांड्या देखील बॉल टू रन खेळत होता.

अखेर बॉल टू रन खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने शेवटची काही षटके शिल्लक राहिले असताना आपला गिअर बदलला. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला 125 धावांच्या जवळ पोहचवले. मात्र 20 व्या षटकात तो 50 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. त्यानंतर गुजरातने 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT