hardik pandya gujarat titans ipl final record 
IPL

आजवर हार्दिक एकही IPL फायनल हरला नाही, मुंबईप्रमाणे गुजरात लकी ठरेल?

फायनलमध्ये हार्दिकने पराभवाचे तोंड नाही पाहिले; यंदा गुजरात होणार चॅम्पियन?

Kiran Mahanavar

आयपीएल 2022 ची फायनल रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळली जाणार आहे. दोन्ही संघांनी या आयपीएल हंगामात जबरदस्त खेळी केली. शेवटच्या सामन्यात कोणाचं नशीब साथ देते, यावर सर्वांच्या नजरा असतील. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक खास विक्रम आहे. तो कधीच फायनलमध्ये हारला नाही.(hardik pandya gujarat titans ipl final record)

आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच हंगामातच अंतिम फेरी गाठली आहे. पण हार्दिक पांड्याची काही पहिलीच आयपीएल फायनल खेळत नाही. तो याआधी पण चार वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. महत्वाचं म्हणजे चारही फायनल त्याने जिंकल्या आहेत. पांड्या गुजरात टायटन्सपूर्वी मुंबई इंडियन्स कडून खेळत होता. हार्दिक पांड्याने 2015 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने मुंबई इंडियन्ससोबत 2015, 2017, 2019, 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहे.

आयपीएल 2022 च्या हंगामात हार्दिक पांड्या एका संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ फायनला पोहोचला आहे. अशा वेळेस विजेतेपद मिळवून तो इतिहास रचू शकतो. पांड्या तसेच आयपीएल फायनल जिंकण्याचा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. हार्दिक पांड्याच्या या हंगामामध्ये फलंदाजीत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीने 453 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याने या हंगामात 4 अर्धशतके पण केली आहेत. पांड्यासाठी हा हंगाम फलंदाज म्हणून सर्वोत्तम ठरला आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्सशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री 8 वाजता खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्सने क्वालिफायर-1 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. गुजरात टायटन्सला पहिला हंगाम खेळत असताना त्यांना चॅम्पियन बनण्याची संधी आहे, तर राजस्थान रॉयल्सने 2008 साली हे विजेतेपद पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT