Hardik Pandya hugs Rohit Sharma Wife Ritika Sajdeh News Marathi 
IPL

IPL 2024 : रोहित शर्माची पत्नी मुलीसोबत खेळत होती होळी, हार्दिक पांड्या आला अन्.... व्हिडिओ होतोय व्हायरल

Hardik Pandya hugs Ritika Sajdeh : आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता.

Kiran Mahanavar

Hardik Pandya hugs Ritika Sajdeh : आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माच्या जागी फ्रेंचायझीने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले.

त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवल्यानंतर पत्नी रितिका सजदेहने सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्या दिवसापासुन चाहतेही हार्दिकला सतत ट्रोल करत आहेत. काल सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, भारतात सोमवारी रंगांचा सण होळी साजरी करण्यात येत आहे. भारतीय खेळाडूंसोबत आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंनीही उत्साहात होळी खेळून एकमेकांना रंग लावत आहे. यावेळी रोहित शर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पत्नी आणि मुलीसोबत होळी खेळत आहे. पण यासोबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या रोहितची पत्नी रितिका सजदेहला मिठी मारताना दिसला.

मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर मुंबईचे चाहते हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली फक्त एकच सामना खेळला गेला असला तरी रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते आधीच संतापले होते.

नरेंद्र मोदी स्टेडियमचा एक व्हिडिओही व्हायरल होत होता. ज्यामध्ये हार्दिकचे आणि रोहितचे चाहते भिडले होते. दोन्ही खेळाडूंचे चाहते एकमेकांच्या विरोधात असण्याची शक्यता आहे परंतु खेळाडूंमध्ये असे काहीही दिसत नाही. दोघांचीही कुटुंबे एकमेकांसारखी आहेत आणि सामना संपल्यानंतर हार्दिकनेही रोहितला मिठी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT