Hardik Pandya Statement After 1st Win As MI Captain  esakal
IPL

Hardik Pandya MI vs DC : खूप प्रेम देणारी अन् काळजी घेणारी लोकं! पहिल्या विजयानंतर मुंबईचा कॅप्टन पांड्या म्हणाला तरी काय?

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Reaction After First Win MI vs DC IPL 2024 : मुंबई इंडियन्सची नौका अखेर किनाऱ्याला लागली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव करत आपला हंगामातील पहिला विजय साजरा केला. मुंबईनं दिल्लीसमोर विजयासाठी 235 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दिल्लीला 20 षटकात 205 धावांपर्यंतच मजल मारतला आली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी हा विजय खास होता.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा हा पहिला विजय आहे. या विजयानंतर हार्दिकने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'विजयी कर्णधार होण्याची फिलिंग ही पराभूत होणाऱ्या कर्णधारापेक्षा नक्कीच चांगली असते मला ती आवडते.'

'आम्ही खूप कष्ट करतोय. पराभवानंतर स्वतःला पुन्हा लढण्यासाठी सज्ज करणं अवघड असते. आज आमच्या सर्व रणनिती काम करून गेल्या. आम्ही काही टॅक्टिकल चेंज केले होते. आम्ही संघात अनेक बदल केले. मात्र आता आम्ही आमची प्लेईंग 11 ठरवली आहे.'

पांड्या मैदानावरील सपोर्टबद्दल म्हणाला की, 'आजूबाजूला खूप प्रेम करणाऱ्या व्यक्ती आणि काळजी घेणाऱ्या व्यक्ती आहेत. प्रत्येकाला माहिती आहे की आम्ही सलग तीन सामने हरले. तरी देखील आम्हाला मिळणारा पाठिंबा आणि आमच्यावरचा विश्वास कमी झालेला नव्हता. सर्वांना एकच माहिती होतं की आम्हाला फक्त एकाच विजयाची गरज आहे. आज सुरूवात झाली आहे.'

'सर्वांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली ती जबरदस्त होती. आम्हाला लय मिळणे गरजेचे होते. प्रत्येकाने संधीचं सोनं केलं हे पाहून भारी वाटलं.'

रोमारियोबद्दल पांड्या म्हणाला की, 'रोमारियोने काही फटकेबाजी केली. त्यानं आम्हाला सामना जिंकून दिला. आमच्या विजयात त्याच्या फटकेबाजीचा मोठा वाटा आहे. त्याच्या चेहऱ्यावर कामय हास्य असतं. तो परिस्थितीपासून पळून जात नाही.'

'तो ज्या प्रकारे खेळला ते पाहून त्याचा खूप अभिमान वाटतो. गोलंदाजीत सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोक्याच्या क्षणी विकेट घेतली. त्यामुळे मला गोलंदाजी करण्याची गरज भासली नाही.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT