Harshal Patel RCB vs RR IPL 2023 : esakal
IPL

Harshal Patel RCB vs RR : अखेर आरसीबीच ठरला रॉयल; हर्षल पटेलच्या गोलंदाजीसमोर राजस्थानची शिजली नाही डाळ

अनिरुद्ध संकपाळ

Harshal Patel RCB vs RR IPL 2023 : दोन रॉयल्समधील शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा ताणून धरलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव केला. आरसीबीने राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र राजस्थानला 20 षटकात 6 बाद 182 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल अखेर आजच्या सामन्यात चमकला. त्याने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी टिपले. तर राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर जुरेलने 16 चेंडूत 34 धावा करत शेवटपर्यंत झुंज दिली.

आरसीबीने विजयासाठी ठेवलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. धडाकेबाज फलंदाज जॉस बटलरला मोहम्मद सिराजने शुन्यावर बाद केले. मात्र त्यानंतर राजस्थानने सावध सुरूवात करत भागीदारी रचण्यावर भर दिला. यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानला 10 षटकात 92 धावांपर्यंत मजल मारून दिली.

पहिल्या 10 षटकात राजस्थानाल 92 धावांपर्यंत पोहचवल्यानंतर देवदत्त पडिक्कलने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी शतकी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच डेव्हिड विलीने 34 चेंडूत 52 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले.

देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर 37 चेंडूत 47 धावा करणारा यशस्वी जैसवाल देखील बाद झाला. त्याची शिकार हर्षल पटेलने केली. पाठोपाठ संजू सॅमसन देखील 22 धावा करून माघारी परतला. त्यालाही हर्षल पटेलनेच बाद केले. पाठोपाठ दोन विकेट पडल्याने राजस्थानची धावगती मंदावली. त्यात हेटमायर (3) देखील धावबाद झाला.

अखेर सामना 12 चेंडूत 33 धावा असा आला होता. अश्विन आणि जुरेल स्ट्राईकवर होते. मोहम्मद सिराज टाकत असलेल्या 19 व्या षटकात पहिल्या चार चेंडूत 5 धावा झाल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जुरेलने षटकार मारला तर पुढच्या चेंडूवर 2 धावा केल्या. यामुळे सामना आता 6 चेंडूत 20 धावा असा आला.

हर्षलले टाकलेले शेवटचे षटक असे...

6 चेंडूत 20 धावा - पहिल्या चेंडूवर अश्विनने मारला चौकार

5 चेंडूत 16 धावा - अश्विनने दोन धावा पळून काढल्या

4 चेंडूत 14 धावा - अश्विनने हर्षलला चौकार मारला

3 चेंडूत 10 धावा - अश्विन झेलबाद झाला

2 चेंडूत 10 धावा - बसीतने 1 धावा केली.

1 चेंडूत 9 धावा - ध्रुव जुरेलने 1 धाव केली.

आरसीबने 7 धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने खराब सुरूवातीनंतर 15 षटकात 156 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी आरसीबी 200 पार धावसंख्या उभारेल असे वाटत होते. मात्र राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात आरसीबीचे 4 फलंदाज बाद करत त्यांना 189 धावात रोखले.

आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (77) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी रचली. राजस्तानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर यशस्वी जैसवालने दोन धावबाद केले. आजच्या सामन्यात आरसीबीचे तीन फलंदाज धावबाद झाले.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT