I shut up Indian fans Harry Brook answers rubbish words with smashing IPL century  
IPL

IPL 2023 : 'मी तोंड बंद...' शतक झळकावताच हॅरी ब्रुकला आला माज, भारतीय चाहत्यांचा केला अपमान

सनरायझर्स हैदराबादने ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले, तो पहिल्या तीन सामन्यात केवळ 29 धावा करू शकला पण...

Kiran Mahanavar

IPL 2023 Harry Brook : इंग्लंडचा प्रतिभावान फलंदाज हॅरी ब्रूकची चर्चा सध्या जोरात आहे. ब्रूकने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावले आहे. ब्रूक हा तोच खेळाडू आहे ज्यावर अलीकडे सोशल मीडियावर टीका होत होती. 'मिलियन डॉलर' बेबी ब्रूक प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहे.

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने पहिल्या 3 सामन्यात काही खास कामगिरी केली नाही, त्यानंतर लोकांनी या इंग्लिश फलंदाजाला खूप सुनावले. या खेळाडूवर फ्रँचायझीने खर्च केलेले 13.25 कोटी रुपये वाया गेले असल्याचे लोकांनी सांगितले. पण आता हॅरी ब्रूकने शतक झळकावून त्या टीकाकारांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे.

हॅरी ब्रूकने 55 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. ब्रूकच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या 19 व्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा 23 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला.

सामना संपल्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच बनलेला हॅरी ब्रूक म्हणाला, 'माझ्यासाठी ही रात्र खास होती. मी कोणत्याही स्थितीत फलंदाजीसाठी तयार होतो. चाहत्यांचा गोंगाट नेत्रदीपक होता. मला मजा आली. हेच लोक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मला वाईट म्हणत होते. आज अनेक भारतीय चाहत्यांनी माझे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी हे लोक माझी चेष्टा करत होते, पण खरे सांगायचे तर मी आता त्यांना गप्प केले आहे.

सनरायझर्स हैदराबादने ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले, तो पहिल्या तीन सामन्यात केवळ 29 धावा करू शकला. पण अखेर त्याला लय सापडली. हॅरी ब्रूकचे पहिले शतक आणि कर्णधार एडन मार्करामच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने KKR वर शानदार विजय नोंदवला. ब्रूकच्या नाबाद 100 आणि मार्करामच्या 50 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 4 गडी गमावून 228 धावा केल्या. ब्रूकने 55 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकार ठोकले.

दुसरीकडे कर्णधार नितीश राणाच्या 75 धावा आणि रिंकू सिंगच्या नाबाद 58 धावा (31 चेंडू, चार चौकार, चार षटकार) असूनही केकेआरचा संघ निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 205 धावाच करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT