Virat Kohli
Virat Kohli 
IPL

Video : अन् अंपायर कॉलनं घेतली विराटची विकेट

सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या माफक धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात खराब झाली. संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्याच षटकात तंबूत परतला. पहिल्या षटकात विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारला एक खणखणीत चौकार मारून दमदार सुरुवात केली. पण भुविचा इनस्विंग चेंडूचा अंदाज घ्यायाला तो चुकला. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू विराट कोहलीच्या पॅडवर जाऊन आदळला. भुवीन जोरदार अपील केली अन् मैदानातील पंचांनी बोट वरती केले.

विराट कोहलीने नॉन स्ट्रायकर असलेल्या युवा देवदत्त पडिक्कलकडे पाहिले. त्यानेही आउट नाही, असे आपल्या कर्णधाराला सांगितले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधाराने रिव्ह्यू घेतला. पण अंपायर कॉलमुळे विराटला माघारी जावे लागले. DRS च्या नियमावलीनुसार, अंपायर कॉलमुळे मैदानातील पंचांनी दिलेला निर्णय कायम राहिला आणि विराट कोहलीला अवघ्या 5 धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला. अंपायर कॉलमुळे रॉयल चॅलेंजर्सचा रिव्ह्यू वाचला असला तरी कोहलीला माघारी परतावे लागले.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा अवघ्या 13 धावा करुन परतल्यानंतर केन विल्यमसन आणि जेसन रॉय जोडीनं 70 धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. पण ही दोघं माघारी परतल्यानंतर तळातील फलंदाजांनी पुन्हा निराश केले. त्यामुळे हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 141 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

यंदाच्या हंगामानंतर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद सोडणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली यंदाच्या स्पर्धेत संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. बंगळुरुचा संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करत असला तरी कोहलीची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी राहिलेली नाही. कोहलीनं यंदाच्या हंगामातील 13 सामन्यात 30.16 च्या सरासरीनं 3 अर्धशतकासह 362 धावा केल्या आहेत. 72 ही त्याची सर्वोच्च कामगिरी असून प्ले ऑफमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT