IPL

IPL 2021: "तर विराटने त्या चेंडूवरही नक्कीच चौकार लगावला असता"

विराज भागवत

विराट कोलकाताविरूद्ध स्वस्तात परतला माघारी

IPL 2021: कोलकाता (KKR) संघाने विराट कोहलीच्या बंगळुरू (RCB) संघाला कालच्या सामन्यात ९ गडी राखून हरवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) सुरूवातीला सुंदर चौकार लगावला. पण त्यानंतर इन स्विंग होणाऱ्या एका चेंडूवर तो लगेचच बाद झाला. ४ चेंडूच्या खेळीत त्याने १ चौकार मारला आणि तो पायचीत झाला. टप्पा स्विंग झालेला त्याला समजला नाही, त्यामुळे त्याला स्वस्तात माघारी जावे लागले. विराटच्या अशा प्रकारे बाद होण्यामागे नक्की काय कारण असावे? यावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने मत मांडले.

"गेले काही डाव विराट छोट्या चुकांमुळे बाद होतोय. काल जे झालं ते पहिल्यांदा झालेलं नाही. मला असं वाटतं की तो ज्या मानसिकतेतून खेळायला उतरतो त्यामुळे तो चेंडू मिस करतो. जर तो उत्तम लयीत असता तर त्याच्या बॅटमधून त्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला असता हे नक्की. विराटचा सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. पण लवकरच तो उत्तम खेळ करताना दिसेल", असे पार्थिव पटेल म्हणाला.

विराटच्या फलंदाजीतील चुकांसोबतच त्याने आणखी एका गोष्टीकडेही लक्ष वेधले. तो म्हणाला, "विराटला बाद करण्याचे श्रेय गोलंदाजालाही दिलेच पाहिजे. आधीच्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू नीट टाकणे आणि त्यावर विकेट घेणे ही एक कला आहे. त्याने टाकलेला चेंडू हा खेळण्यासाठी तसा कठीणच होता. विराटने चेंडू समजण्यात आणि खेळण्यात चूक केली हे मान्य आहे, पण गोलंदाजालाही याचं श्रेय आहे", असे पटेल याने नमूद केले.

IPL 2021: RCBच्या पराभवावर विराट काय म्हणाला?

"सुरूवात चांगली मिळाल्यानंतर आमच्या खेळाडूंकडून भागीदारीच्या अपेक्षा होती. आम्ही ४२ धावांवर १ बाद या धावसंख्येवर होतो. तेथून थेट २० धावांत आमचे ५ बळी बाद झाले. कदाचित दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच आम्हाला ही धोक्याची घंटा दिसली. जेणेकरून आम्ही यावर नीट काम करू. आम्ही आमच्या खराब कामगिरीबद्दल काही ना काही काही कारणं देऊ शकतो. पण त्याने काहीच होणार नाही. कारण अशी काहीतरी कारणं दिल्याने केवळ संघ पराभूत होतो", असं विराट म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

'पुष्पा २' मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप होतोय... अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली- मला खूप वाईट...

Kolhapur Municipal : १० कोटींच्या थकबाकीसाठी धडक कारवाई; जलसंपदा विभागाचे २४ विभाग सील

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

SCROLL FOR NEXT