RR-vs-PBKS-Kartik-Tyagi 
IPL

IPL 2021 Points Table: भन्नाट विजयासह राजस्थान पाचव्या स्थानी

IPL 2021 Points Table: भन्नाट विजयासह राजस्थान पाचव्या स्थानी राजस्थानचा शेवटच्या षटकात पंजाबवर थरारक विजय IPL 2021 Points Table after RR vs PBKS as Kartik Tyagi clinches last ball thriller vjb 91

विराज भागवत

राजस्थानचा शेवटच्या षटकात पंजाबवर थरारक विजय

IPL 2021 RR vs PBKS: पंजाब संघाविरूद्ध राजस्थानने शेवटच्या षटकात चित्तथरारक विजय मिळवला. राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८५ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी शतकी सलामी दिली होती. पण ते दोघे बाद झाल्यावर सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला आणि अखेर २० वर्षांच्या कार्तिक त्यागीने शेवटच्या चेंडूवर राजस्थानला सामना जिंकवून दिला. या विजयासह राजस्थानने सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी झेप घेतली.

पाहा IPL 2021 Points Table-

संघ - सामने - विजय - गुण

चेन्नई - ८ - ६ - १२

दिल्ली - ८ - ६ - १२

बंगळुरू - ८ - ५ - १०

मुंबई - ८ - ४ - ०८

----------------------------

राजस्थान - ८ - ४ - ०८

कोलकाता - ८ - ३ - ०६

पंजाब - ८ - ३ - ०६

हैदराबाद - ७ - १ - ०२

असा रंगला सामना

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १८५ धावा केल्या. सलामीवीर एव्हिन लुईस (३६) आणि यशस्वी जैस्वाल (४९) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. महिपाल लॉमरॉरने तुफान फटकेबाजी करत १७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर राहुल (४९) आणि मयंक अग्रवाल (६७) यांनी १२० धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर निकोलस पूरनने (३२) फटकेबाजी केली. एडन मार्क्रमही दमदार फलंदाजी करत होता, पण शेवटच्या दोन षटकात त्याला फारशी फलंदाजी मिळाली नाही. परिणामी शेवटच्या षटकात ४ धावांची गरज असूनही पंजाबला त्या धावा जमवता आल्या नाहीत. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केवळ १ धाव देत राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT