kartik tyagi 
IPL

VIDEO : सामना फिरवणारी कार्तिक त्यागीची खतरनाक 'डेथ ओव्हर' बघाच

अखेरच्या षटकात पंजाब किंग्जला विजयासाठी 4 धावा हव्या होत्या.

सुशांत जाधव

IPL 2021 : युवा जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) याने अखेरच्या षटकात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकून दिला. अखेरच्या षटकात पंजाब किंग्जला (Punjab Kings) विजयासाठी 4 धावा हव्या होत्या. त्यांनी केवळ दोनच विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे पंजाब हा सामना सहज खिशात टाकेल असे चित्र स्पष्ट दिसत होते. पण कार्तिकने सामन्याला कलाटणी दिली.

त्यागीने पहिल्या तीन चेंडूत केवळ एक धाव खर्च केली. पहिला चेंडू मार्करमने निर्धाव खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेत स्ट्राईक निकोलस पूरनला दिले. तिसऱ्या चेंडूवर सेट झालेल्या पूरनने संजू सॅमसनच्या हाती झेल दिला आणि पंजाबला तिसरा धक्का बसला. पूरनची जागा घेण्यासाठी आलेल्या दीपक हुड्डाने पहिला चेंडू खेळून काढला. त्यानंतर कार्तिकने त्यालाही खाते न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना कार्तिकने एलन फॅबिनला निर्धाव चेंडू टाकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना पंजाबला 4 विकेटच्या मोबदल्यात 183 धावांपर्यंतच मजल मारता आली. कार्तिक त्यागीने पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालने केलेल्या 120 धावांच्या खेळीसह अर्शदिपने घेतलेल्या 5 विकेट्सची कामगिरी व्यर्थ ठरवली. कार्तिक त्यागीने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 29 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकात घेतलेल्या दोन विकेट सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT