RCB vs SRH 
IPL

Video : हर्षलचा जबरदस्त इनस्विंग; केनच्या उडवल्या दांड्या

केन विल्यमसन आणि जेसन रॉय या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची खेळी केली.

सुशांत जाधव

Harshal Patel Beautiful Bowled Ken Williamson Video : आयपीएल स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करुन सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलनं हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची जोडी फोडली. त्याने सलामीवीर जेसन रॉयच्या साथीनं अर्धशतकी खेळी करुन संघाचा डाव सावरणाऱ्या केन विल्यमसनला बोल्ड केले. हैदराबादच्या डावातील 12 व्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षलनं संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली.

नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने सलामी जोडीत बदलाचा प्रयोग केल्याचे पाहायला मिळाले. वृद्धिमान साहाच्या जागी जेसन रॉयसोबत अभिषेक शर्माने संघाच्या डावाची सुरुवात केली. अभिषेकनं आक्रमक सुरुवात केली. पण धावफलकावर अवघ्या 14 धावा असताना तो मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याची विकेट पडल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन मैदानात उतरला.

केन विल्यमसन आणि जेसन रॉय या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची खेळी केली. ही जोडी बंगळुरुसाठी डोकेदुखी ठरत असताना हर्षल पटेलनं संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. जबरदस्त इनस्विंगवर केन विल्यमसन सपशेल सरेंडर केल्याचे पाहायला मिळाले.

सनरायझर्स हैदराबादचा स्पर्धेतील प्रवास कधीच संपुष्टात आला आहे. उर्वरित सामने जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. उर्वरित दोन सामन्यातील विजयासह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT