Rishabh Pant -
IPL

DC vs KKR : पंतनं मोडला सेहवागचा मोठा विक्रम

रिषभ पंतने आयपीएलच्या कारकिर्दित 79 सामन्यातील 79 डावात 2390 धावा केल्या आहेत.

सुशांत जाधव

Most Runs for Delhi Capitals in T20: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. पंतने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 36 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावरच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला 9 बाद 127 धावांपर्यंत मजल मारता आली. पंतने विरेंद्र सेहवागला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विरेंद्र सेहवागच्या नावे होते. सेहवागने दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना 2382 धावा कुटल्या आहेत. रिषभ पंतने केकेआर विरुद्ध 39 धावांची खेळी केली. या खेळीसह आता पंतच्या खात्यात 2390 धावांची नोंद झाली आहे. दिल्लीकडून खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम आता पंतच्या नावे झालाय.

दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विरेंद्र सेहवागच्या नावे होते. सेहवागने दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना 2382 धावा कुटल्या आहेत. रिषभ पंतने केकेआर विरुद्ध 39 धावांची खेळी केली. या खेळीसह आता पंतच्या खात्यात 2390 धावांची नोंद झाली आहे. दिल्लीकडून खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम आता पंतच्या नावे झालाय.

रिषभ पंतने आयपीएलच्या कारकिर्दित 79 सामन्यातील 79 डावात 2390 धावा केल्या आहेत. त्याने 35.67 च्या सरासरीसह 148.36 च्या स्ट्राइक रेटने या धावा काढल्या आहेत. यात एका शतकासह 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 128 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पंतने आयपीएलमध्ये 216 चौकार आणि 109 षटकार खेचले आहेत. यंदाच्या हंगामापूर्वी श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचने नेतृत्व देण्यात आले. अय्यर संघात परतल्यानंतही संघाची धूराही पंतकडेच ठेवण्याचा निर्णय फ्रेंचायझींनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT