Sanju Samson  
IPL

IPL 2021, Orange Cap Race : संजूनं गब्बरला टाकलं मागे

शिखर धवन आणि लोकेश राहुल हे देखील या शर्यतीत आहेत.

सुशांत जाधव

IPL 2021, Orange Cap Race : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (sanju samson) याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दमदार खेळी केली. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात संजू सॅमसनने 57 चेंडूत 82 धावांची खेळी साकारली. यात त्याने 7 चौकार आणि 3 षटकार खेचले. यंदाच्या हंगामात संजू सॅमसनने एका शतकासह दोन अर्धशतके झळकावली असून आपल्या या खेळीत त्याने 41 चौकार आणि 15 षटकार लगावले आहेत. संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत संजू सॅमसन पुन्हा एकदा संघासाठी एकटा लढला. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने 5 विकेटच्या मोबदल्यात 164 धावांची खेळी केली.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या दमदार खेळीसर सॅमसनच्या खात्यात 433 धावा जमा झाल्या आहेत. शिखर धवनला मागे टाकत त्याने ऑरेंज कॅप पटकावली. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन 430 धावांसह या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलचा नंबर लागतो.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यापूर्वी संजू सॅमसनने 183 टी 20 सामन्यात 28 च्या सरासरीने 4417 धावा केल्या होत्या. त्याने 130 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या असून यात 3 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये तो ज्या तोऱ्यात खेळतो त्यापद्धतीने त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात छाप सोडण्यात अपयश आले आहे. 10 सामन्यात 12 च्या सरसरीने त्याने 117 धावा केल्या आहेत. 27 ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयपीएलमध्ये 3 शतकाची नोंद

संजू सॅमसनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 शतके झळकाली आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याने 3000 धावांचा टप्पाही पार केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 3162 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2491 धावा जमा आहेत. 26 वर्षीय फलंदाजाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले आहेत. त्याने नाबाद 212 धावांची नाबाद खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT