Ashiwin and Pant
Ashiwin and Pant 
IPL

IPL 2021 : अश्विन हे वागणं बरं नव्हे; शेन वॉर्नची तिखट प्रतिक्रिया

सुशांत जाधव

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामन्यादरम्यान केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू यांच्यात मैदानात शाब्दिक चमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांच्यातील वाद मिटवण्यासाठी दिनेश कार्तिकला मध्यस्थी करावी लागली होती. दिल्लीच्या डावात रविचंद्रन अश्विन आणि रिषभ पंत बॅटिंग करत होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावर आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने प्रतिक्रिया दिली आहे.

शेन वॉर्नने ट्विटच्या माध्यमातून अश्विन-मॉर्गन वादावर भाष्य केले आहे. अश्विनने मैदानात जे कृत्य केले ते अशोभनिय आहे. त्याने असे करायला नको होते. इयॉन मॉर्गन त्याच्यावर भडकणे स्वाभाविक होते. यात त्याची काहीच चूक वाटत नाही, असेही शेन वॉर्नने म्हटले आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात राहुल त्रिपाठीनं मारलेला थ्रो पंतला लागला. यावेळी अश्विनने धाव घेण्याचा प्रयत्न केला. अश्विनने चोरटी धाव घेण्याचा केलेला प्रयत्न खिलाडूवृत्तीला साजेसा नाही, असे मॉर्गनला वाटले.

अश्विन बाद झाल्यानंतर मॉर्गनने त्याला यावरुनच सुनावले. यावेळी अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने येताना दिसले. कार्तिकने दोघांच्यातील वाद टोकाला जाणार नाही यासाठी पुढाकार घेतला. कार्तिकने तमिळनाडूच्या आपल्या सहकाऱ्याला मैदानाबाहेर जाण्याची विनंती केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शारजहाच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना खेळवण्यात आला. दिल्लीच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 127 धावा केल्या होत्या. सलामीवीर शुभमन गिलच्या 30 धावा आणि मोक्याच्या क्षणी नितीश राणाने केलेल्या नाबाद 36 धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने तीन विकेट राखून विजय नोंदवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT