Virat-Gavaskar 
IPL

विराटने RCBसाठी ट्रॉफी न जिंकणं म्हणजे... - सुनील गावसकर

विराज भागवत

वाचा विराटच्या नेतृत्वशैलीबाबत काय म्हणाले गावसकर...

IPL 2021 Eliminator: विराट कोहलीच्या RCB संघाला कोलकाता संघाकडून पराभूत व्हावे लागले. RCB चा कर्णधार म्हणून हा विराटचा शेवटचा सामना ठरला. विराटने या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. विराटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने शेवटच्या षटकात १३९ धावा केल्या. विराटची RCBचा कर्णधार म्हणून कारकीर्द संपुष्टात आली. त्याला ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याबद्दल लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी भावना व्यक्त केल्या.

Virat Kohli

"विराटच्या RCB चा पराभव होणं आणि विराटने कर्णधार म्हणून IPL चे विजेतेपद न मिळवणं ही बाब दु:खद आहे. प्रत्येकाला आपल्या कारकिर्दीचा शेवट विजेतेपदाने करावासा वाटत असतो. विराटलादेखील आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा शेवट IPLची ट्रॉफी उंचावून करावा असं वाटलं असणार. पण खेळाडूला किंवा फॅन्सला जे हवं त्याप्रमाणे सारं काही घडतं असं नाही. डॉन ब्रॅडमन यांच्या बाबतीत काय घडलं ते आपण पाहिलं. त्यांना धावांची सरासरी १०० राखण्यासाठी शेवटच्या डावात केवळ ४ धावा हव्या होत्या, पण ते शून्यावर बाद झाले. सचिनने २०० कसोटी सामने पूर्ण केले, पण शेवटच्या सामन्यात त्याला ७९ धावांवर बाद व्हावं लागलं. शतकाने त्याला हुलकावणी दिली", अशा उदाहरणांसह गावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आपल्या हवं तसं प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. शेवटचा सामना दमदार कामगिरीसाठी लक्षात राहावा असं सगळ्यांचं भाग्य नसतं. पण असं असलं तरी विराटने RCB साठी काय काय केलंय हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याची कामगिरी कोणीच नाकारणार नाही. RCB कडून खेळताना एका वर्षी त्याने चक्क ९७३ धावा केल्या होत्या. एका हंगामात हजार धावा करण्यासाठी तो केवळ २७ धावांनी कमी पडला. असं खूप कमी वेळा होतं. RCB साठी त्याने खरंच खूप काही केलं आहे. RCB ला ब्रँड म्हणून एका वेगळ्याच उंचीवर तो घेऊन गेला आहे. त्याला RCB चा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकता आली नाही याची साऱ्यांनाच खंत राहिल", असं गावसकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

SCROLL FOR NEXT