Virat Kohli 
IPL

IPL 2021 : कोहलीच्या RCB चं काही खरं नाही, UAE त लाजीरवाणा खेळ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ पुन्हा एकदा पटरीवरुन घसरला आहे.

सुशांत जाधव

IPL 2021 : विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टन्सीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व सोडण्याचीही घोषणा केलीये. युएईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेनंतर कोहली बंगळुरु संघाचे नेतृत्व सोडणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ पुन्हा एकदा पटरीवरुन घसरला आहे.

पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी करुन गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला युएईतील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलकातना नाईट रायडर्स पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जने त्यांना पराभूत केले. चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झालीये. 3 वेळा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेल्या आरसीबीची यूएईतील मैदानात सलग 7 वा पराभव आहे. मागील हंगामात आरसीबीला सलग 5 पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात RCB च्या संघाने दमदार कामगिरी केली होती. मात्र युएईमध्ये दाखल होताच संघ पुन्हा संघर्ष करताना दिसत आहे. सलग दोन पराभवानंतर त्यांच्या नावे नकोसा विक्रम तर नोंद झालाच याशिवाय संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग अडचणीचा झाला आहे.

मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 8 विकेट्सनी पराभूत केले होते. मुंबई इंडियन्सकडूनही त्यांना 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय सनराइजर्स हैदराबादने एकदा 5 तर दुसऱ्यांदा 6 विकेट राखून बंगळुरुला पराभवाचा धक्का दिला होता. दिल्‍ली कॅपिटल्‍सनेही त्यांना 6 विकेट्सनी हरवले होते. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीला 9 विकेट्ने पराभूत केले. त्याच्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरुला 6 विकेट राखून पराभवाचा दणका दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT