Virender Sehwag Take a Dig on Chennai Super Kings Auction Strategy  esakal
IPL

IPL Auction: सेहवागने 3 इडियट्सचा मीम शेअर करत सीएसकेची खेचली

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलचा दोन दिवसाचा मेगा लिलाव (IPL 2022 Auction) बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएल इतिहासातील यशस्वी संघापैकी एक चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपल्या जुन्या संघातील रिटेन न करू शकलेल्या खेळाडूंसाठी मोठी बोली लावली. सीएसकेने जुन्या संघातील बऱ्याच खेळाडूंना यंदाच्या लिलावात पुन्हा आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. सीएसकेच्या या रणनीतीची (Auction Strategy) भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्या खास अंदाजात चेष्टा केली. (Virender Sehwag Take a Dig on Chennai Super Kings Auction Strategy)

विरेंद्र सेहवागने आमीर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करिना कपूर यांच्या गाजलेला 3 इडियट्स (3 idiots)चित्रपटातील एक मीम (Meme) शेअर करत सीएसकेची लिलाव रणनीती काय होती हे सांगितले. या मीममध्ये या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'जाने नही देंगे तुझे' या गाण्यातील ओळी लिहिल्या आहेत. यात आमीर खानचा स्कूटी चालवतानाचा फोटो देखील आहे. याचबरोबर सेहवागने #Loyalty हा देखील वापरला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या लिलावात अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो यासारख्या आपल्या जुन्या आणि अनुभवी खेळाडूंना पुन्हा विकत घेतले. त्यांनी आपले जुने सहकारी फाफ ड्युप्लेसिस आणि शार्दुल ठाकूरसाठी देखील बोली लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघेही सीएसकेच्या बजेटच्या बाहेर गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT