IPL 2022 Bangladesh Cricket Board Give blow to Lucknow Super Giants
IPL 2022 Bangladesh Cricket Board Give blow to Lucknow Super Giants  esakal
IPL

IPL 2022: राहुलच्या लखनौची बांगलादेश बोर्डाने वाढवली डोकेदुकी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल हंगामासाठी कंबर कसत आहे. मात्र त्यांच्यामागे लागलेल्या अडचणींचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने (Mark Wood) दुखापतीमुळे आयपीएलमधून काढता पाय घेतल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट म्हणून बांगलादेशच्या तास्किन अहमदची (Taskin Ahmed) निवड करण्यात आली होती. मात्र आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) तास्किन अहमदला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मार्क वूडच्या हाताला दुखापत झाल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडला. लिलावात लखनौ सुपर जायंटने त्याला 7.5 कोटी रूपये खर्चून खरेदी केले होते. मार्क वूड आयपीएलमधून बाहेर गेल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट म्हणून बांगलादेशच्या तास्किनशी संपर्क करण्यात आला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तास्किन अहमदला आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. सध्या बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार बीसीबी क्रिकटेचे प्रमुख जलाल युनूसने सांगितले की, 'आम्हाला दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मालिकेनंतर श्रीलंकेबरोबर घरच्या मैदानावर देखील एक मालिका खेळायची आहे. यामुळे आम्हाला वाटते की यावेळी तास्किनने आयपीएलमध्ये सहभागी होणे योग्य नाही.' सध्या बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तेथे तो वनडे मालिका खेळत आहे. यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका देखील होणार आहे. ही मालिका 11 एप्रिलपर्यंत चालेल. तर आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे.

युनूस पुढे म्हणाले की, 'आम्ही तास्किनबाबत या विषयी चर्चा केली आहे. त्यांना पूर्ण स्थिती समजावून सांगितली आहे. त्यानेही फ्रेंचायजीला कळवले आहे की तो आयपीएल खेळू शकणार नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT