Mayank Agarwal
Mayank Agarwal Sakal
IPL

VIDEO : मंयाकच्या अंगात शिरला विराट; भर मैदानात 'शिवराळ' भाषा

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022, CSK vs PBKS : मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने गतविजेत्या चेन्नईसमोर तगडे आव्हान ठेवले. फलंदाजीत कर्णधार मयांक अग्रवालला (Mayank Agarwal) आपल्या नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. तो अवघ्या 4 धावांवर बाद झाला. पण लिविंगस्टोननं संघाला तारले. गोलंदाजीवेळीही पंजाबच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. सुरुवातीपासून धक्क्यावर धक्केत पंजाब किंग्जने (PBKS) चेन्नईच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. पॉवर प्लेमध्ये चेन्नईचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले.

पंजाबचा संघ मजबूत स्थितीत दिसत असताना शिवम दुबे (Shivam Dube) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीमध्ये भागीदारी फुलत असताना पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मयांक अग्रवाल तसा संयमी आहे. पण फिल्डिंग सेट करताना त्याचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले. हातवारे करताना ओरडून त्याने अपशब्द वापरल्याचा प्रकार पाहायला मिळाला. लिप्स मुव्हमेंटवरुन तो शिवी देत असल्यासारखे वाटले. एका नेटकऱ्याने त्याच्या रुद्ररुपाचा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. अनेकांना त्याच्या या शैलीचं आश्चर्य वाटत आहे.

क्रिकेटच्या मैदानात मयांकच्या अंगात शिरला कोहली

भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत असताना विराट कोहलीचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला आहे. आयपीएलच्या सामन्यातही विराट अगदी त्याच तोऱ्यात वावरायचा. काही चाहत्यांना त्याचा हा स्वभाव आवडायचा. तर काही चाहते याच कारणामुळे विराट कोहलीकडे पाठ फिरवायचे. मयांक अग्रवालने जो प्रकार केला त्यावेळी अनेकांना कोहलीच्या कॅप्टन्सीची आठवण निश्चित आली असेल. त्याच्या अंगात जणून विराटच वारं भरलंय, असेच चित्र पाहायला मिळाले. लोकेश राहुल पंजाबमधून बाहेर पडल्यानंतर पंजाब फ्रँचायझीनं मयांक याच्यावर भरवसा ठेवला आहे. तो कशी कॅप्टन्सी करणार? त्याला नेतृत्व जमणार का? असे प्रश्न उपस्थितीत होत असताना आता त्याच्या नेतृत्वासंदर्भात चर्चेला एक मुद्दा जमा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT