Gujarat Titans Appoint Rashid Khan As Vice-Captain ESAKAL
IPL

IPL 2022: हार्दिकला मिळाला अफगाणी डेप्युटी; GTने निवडला उपकर्णधार

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 मधील (IPL 2022) नवा संघ गुजरात टायटन्स आपला पहिला सामना उद्या दुसरा नवा संघ लखनौ सुपर जायंटबरोबर खेळणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी आपला उपकर्णधार (Vice-Captain) निवडला आहे. गुजरात टायटन्सने अफगाणिस्तानचा दिग्गज लेग स्पिनर राशिद खानकडे (Rashid Khan) ही नवी जबाबदारी सोपवली आहे. तो आता हार्दिक पांड्याचा डेप्युटी असणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओ गुजरातने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.

गुजरात टायटन्सने लिलावापूर्वी हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि राशिद खान यांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले होते. हार्दिक पांड्या नवा गुजरातचा संघ लीड करणार हे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र उपकर्णधाराबाबत गुजारात टायटन्सने अजूनपर्यंत कोणतीही घोषणा केली नव्हती. गुजरात 28 मार्चला आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधी आज गुजरातने आपल्या उपकर्णधाराची घोषणा केली.

अफगाणिस्तानने आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 विकेट घेतल्या आहेत. तो बऱ्याच काळापासून सनरायजर्स हैदराबादकडून खेळत होता. मात्र आयपीएलच्या 2022 च्या मेगा लिलावापूर्वीच गुजरात टायटन्सने राशिद खानला विकत घेतले. गुजरात टायटन्स आपला पहिला सामना लखनौ सुपर जायंटबरोबर खेळणार आहे. लखनौच्या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

Interstate Car Racket : कार भाड्याने घ्यायचे, अन् बनावट कागदपत्रे बनवून विकायचे; आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश; दोघे जेरबंद!

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

SCROLL FOR NEXT