MS Dhoni And Ravindra Jadeja
MS Dhoni And Ravindra Jadeja Sakal
IPL

IPL 2022 : धोनीच्या जीवावर कॅप्टन्सी मिरवू नको, जड्डूला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 , Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसते. हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) बॉम्ब टाकला. तो अखेरच्या क्षणी संघाच्या कॅप्टन्सीपासून दूर झाला. त्याच्या या निर्णयानंतर नेतृत्वाची धूरा रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) खांद्यावर येऊन ठेपली आहे. जड्डूच्या नेतृत्वाखाली संघाला सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई संघाच्या (CSK) खराब कामगिरीवर चर्चा सुरु असताना आता हरभजन सिंगनेही (Harbhajan Singh) आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. सध्याच्या घडीला धोनीच संघाचे नेतृत्व करतो, असे वाटते. वेळ हातून निघून जाण्याआधी रविंद्र जडेजाने स्वत:चा स्टँड घ्यायला पाहिजे, असे भज्जीने म्हटले आहे. धोनीच्या जीवावर कॅप्टन्सी मिरवू नको, असा सल्लाच हरभजनने चेन्नईच्या कॅप्टनला दिल्याचे दिसते.

स्टार स्पोर्ट्सवरील शोमध्ये भज्जी म्हणाला की, 'चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहताना महेंद्रसिंग धोनीच अजूनही कॅप्टन्सी करत असल्याचे भासते. जेव्हा मी जडेजाकडे बघतो त्यावेळी तो सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना दिसतो. यामुळे मॅचवरील नियंत्रण तुमच्या हातून निसटून जाते. जडेजाने फील्ड सेट करण्यासह रणनितीची डोकेदुखी धोनीवर सोपवल्याचे वाटते, असे अंग झटकून चालणार नाही.

भज्जी पुढे म्हणाला की, फिल्ड सेट करण्याच्या नावाखाली जडेजाने काही जबाबदारी धोनीकडे सोपवल्याचे दिसते. जडेजा हा आत्मविश्वासू आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये त्याचा कुणीही हात धरु शकत नाही. पण आता संघाच्या कामगिरीसाठी त्याला स्टँड घ्यावाच लागेल, असेही भज्जी म्हणालाय. ही गोष्ट जडेजा पुढच्या सामन्यात मनावर घेणार का? आणि चेन्नई विजयाचं खाते उघडणार का? हे येणारा काळच ठरवेल.

जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने पराभवाचा दणका दिला होतो. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या लखनौनेही त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी करुन दाखवली. चेन्नईला दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करुनही सामना जिंकता आला नाही. त्यानंतर पंजाबच्या संघानेही त्यांना पराभूत केले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला सुरुवातीलाच सलग तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2020 च्या हंगामाप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर प्ले ऑफआधीच बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. या अनुभवाचा फायदा उठवत ते पुन्हा कमबॅक करतील, अशी चेन्नईच्या चाहत्यांना अपेक्षा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT