IPL 2022 Jos Buttler Complete 100 Sixes In IPL  ESAKAL
IPL

RR vs RCB : एकही चौकार न मारणाऱ्या बटलरचे 'षटकारांचे' शतक

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) भलत्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने हंगामातील पहिले शतक ठोकत धडाक्यात सुरूवात केली. त्यानंतर जोस बटलरने आजच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरूद्धच्या सामन्यात देखील दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 42 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. जरी आज त्याला शतकी मजल मराता आली नसली तरी त्याने आयपीएलमध्ये षटकारांचे शतक (IPL 100 Sixes) ठोकले. विशेष म्हणजे बटलरने आपल्या 70 धावांच्या खेळीत एकही चौकार मारलेला नाही. त्याने आपल्या या नाबाद खेळीत 6 षटकार मारले.

वानखेडेवरील संथ खेळपट्टी पाहून राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने सावध सुरूवात केली. त्याने बॉल टू रन रणनितीने फलंदाजी करत अँकर इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने संपूर्ण 20 षटके खेळून काढत नाबाद 70 धावांचे योगदान दिले. सुरूवातीला बॉल टू रन पद्धतीने खेळणाऱ्या बटलरने स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज खेळी केली. त्याने षटकारांची बरसात करत राजस्थानला 3 बाद 169 धावांपर्यंत पोहचवले. बटलरला हेटमायरने चांगली साथ देत 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने देखील 37 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आरसीबीने राजस्थानचा 170 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि अर्जुन रावत यांनी पॉवर प्लेमध्ये अतिरिक्त जोखीम घेतली नाही. या दोघांनी 55 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर राजस्थानने आरसीबीला धक्के देण्यास सुरूवात केली. पहिला धक्का आरसीबीचा जुना सहकारी युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) दिला. त्याने ड्युप्लेसिसला 29 धावांवर बाद केले. त्यानंतर नवदीप सैनीने अर्जुन रावतला 26 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. आरसीबीचा जुना सहकारी युझी याच्यावरच थांबला नाही. त्याने विराट कोहलीच्या रनआऊटमध्ये देखील महत्वाची भुमिका निभावली. त्याच षटकात चहलने डेव्हिड विलीचा दांडी गुल करत आपली दुसरी शिकार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT