mark wood  sakal
IPL

IPL 2022 : लोकेश राहुलच्या संघाला धक्का, 7.5 कोटींचा गडी आउट

सकाळ डिजिटल टीम

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज मार्क वूड याने आगामी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याची दुखापत लखनऊ सुपर जाएंट्ससाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. मार्क वूड याने कोपराला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. मागील आठवड्यात वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान वूड दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात लखनऊ फ्रेंचायझीला सूचना दिलीये. मार्क वूड याच्या जागी लखनऊला बदली खेळाडू मिळू शकतो. लखनऊनचा संघ त्याच्या जागी कुणाला स्थान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वूड याने इंडियन प्रीमियर लीगच्या 2018 च्या हंगामात एकमेव सामना खेळला होता. त्यावेळी तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. यंदाच्या हंगामात मार्क वूड आयपीएल 2022 च्या हंगामात नव्याने मैदानात उतरणाऱ्या लखनऊ संघात सहभागी झाला होता. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात वूड याने केवळ 17 षटके गोलंदाजी केली होती.

आयपीएलच्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जाएंट्स संघाने मार्क वूडसाठी 7.5 कोटी रुपये मोजले होते. त्याला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या फ्रेंचायझी संघाने रस दाखवला होता. पण अखेर लखनऊने बाजी मारली. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातील दुखापतीमुळे तो आता स्पर्धेला मुकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT