MS Dhoni And Gautam Gambhir Sakal
IPL

Video Viral : 'गंभीर' रिलेशन 'खंबीर' धोनी त्यांची नवी स्टोरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एविन लुईस आणि क्विंटन डि कॉकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपरजाएंट्सने (Lucknow Super Giants) IPL 2022 च्या हंगामातील आपला पहिला विजय साकारला. त्यांनी गत विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 6 विकेट्सनं पराभव केला. सामन्यानंतर एक खास चित्र पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni आणि भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) एका फ्रेममध्ये दिसले. दोघांच्यातील प्रेमाचा हा नजारा चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. गौतम गंभीर सध्या लखनऊ सुपर जाएंट्सचा मेंटॉर आहे. सामन्यानंतर या दोन दिग्गजांमध्ये चर्चा सुरु असल्याचे दिसून आले. दोघांच्यातील मैत्रीचा नजारा दाखवणाऱ्या क्षणाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाल्याचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. गौतम गंभीर हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलाय. 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत गंभीरने 97 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. पण सर्वांना लक्षात राहिला तो धोनीचा फिनिशिंग टच. 2011 मध्ये भारतीय संघाने जिंकलेला वर्ल्ड कप हा एकट्या धोनीच्या जोरावर नाही तर संघातील सर्व सहकाऱ्यांच्या जीवावार जिंकलाय, अशा वक्तव्यातून गंभीरनं माजी कॅप्टनला टोलाही अनेकदा लगावला आहे. गंभीरचे आपल्या कॅप्टनसोबत फारसे पटत नसल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.

गौतम गंभीरने धोनीच्या नेतृत्वावरही अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले होते. धोनीला चांगली टीम वारसाने मिळाली, त्यामुळे त्याच्यासाठी नेतृत्व करणं सोपं झालं असं व्यक्तव्य करत सौरव गांगुलीने टीम इंडियाची खऱ्या अर्थाने बांधणी केली, असे रोखठोक मत गंभीरनं मांडलं होते. त्यामुळे धोनी आणि गंभीर यांच्यात टोकाचा वाद आहे असा तर्क अनेकांनी लावला. पण जतिन सप्रूचा YouTube शो ‘ओव्हर अँण्ड आउट’ या कार्यक्रमात गौतम गंभीरने धोनी प्रेम सादर केल्याचे पाहायला मिळाले होते. मी धोनीचा नेहमीच सन्मान करतो. जेव्हा त्याला गरज असेल त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, अशा शब्दांत त्याने धोनी प्रेम दाखवून दिले होते. त्यानंतर आता आयपीएलच्या सामन्यादरम्यानच्या फ्रेममध्ये दोघांतील प्रेम दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT