Rajasthan Team Fielding Coach takes a dig on Yuzvendra Chahal  esakal
IPL

VIDEO : 'दहा रूपयाची पेप्सी युजी भाई सेक्सी'

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022: राजस्थान रॉयल्सने आयपीएल हंगाम 2022 ची विजयाने सुरुवात केली. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. राजस्थानकडून (Rajasthan Royals) संजू सॅमसनने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. तरी गोलंदाजीत युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भेदक मारा करत तीन विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाचीची सामन्यानंतर चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने आपल्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिवर शेअर केला.

या व्हिडिओत युजवेंद्र चहल आणि राजस्थानचे फिल्डिंग कोच दिशांत याज्ञनिक एकमेकांची खेचता दिसत आहेत. दिशांतने युजवेंद्र चहलच्या कामगिरीवर आपल्या भावना व्यक्त केल्या. तो या व्हिडिओत '10 रूपयाची पेप्सी युजी भाई सेक्सी' असे म्हणत असल्याचे दिसते. त्यावर युझवेंद्र चहलने देखील हसून त्याला दाद दिली. हा व्हिडिओ शेअर करत राजस्थान रॉयल्सने कॅप्शनमध्ये 'पुण्याच्या स्टँडपासून ड्रेसिंगरूमपर्यंत सध्या हेच बोलले जात आहे.'

राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध 210 ठोकल्या होत्या. त्यात कर्णधार संजू सॅमसनने 27 चेंडूत 55 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. त्याला देवदत्त पडिक्कलने 41 आणि जोस बटलरने 35 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर हेटमायरने 13 चेंडूत 32 धावा ठोकून राजस्थानला 200 टप्पा पार करून दिला. याच्या प्रत्युतरात खेळणाऱ्या हैदराबादला 20 षटकात 149 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेट बोल्टने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT