IPL 2022 Rajasthan vs Bangalore 13th Match Live Cricket Score Highlights
IPL 2022 Rajasthan vs Bangalore 13th Match Live Cricket Score Highlights esakal
IPL

VIDEO| RR vs RCB : आरसीबीमध्ये 'कार्तिकायन', पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

पाहा डीके आणि शहाबाजने कशी फिरवली मॅच

154-6 : अखेर बोल्टने दिला दिलासा 

आरसीबीचा निम्मा संघ बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहदने सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. मात्र बोल्डने 26 चेंडूत 45 धावा करणाऱ्या शाहबाजला बाद केले.

87-5 : बोल्टने रुदरफोर्ड 5 धावांवर केले बाद, आरसीबीचा निम्मा संघ माघारी

62-4 : चहलने घेतला बदला

युझवेंद्र चहलने 9 व्या षटकात आरसीबीला दोन धक्के दिले. त्याने विराट कोहलीला धावबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर डेव्हिड विलीला बोल्ड करत दुसरा धक्का दिला.

61-2 : नवदीप सैनीने जुन्या फ्रेंचायजीला दिला दुसरा धक्का

नवदीप सैनीने आरसीबीचा सलामीवीर अर्जुन रावतला 26 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. विशेष म्हणजे सैनीची ही जुनी फ्रेंचायजी आहे.

55-1 : युझवेंद्र चहलने दिला आरसीबीला पहिला धक्का

युझवेंद्र चहलने आरसीबीची सलामी जोडी फोडली. त्याने आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला 29 धावांवर बाद करत अर्जुन रावत आणि ड्युप्लेसिसची 55 धावांची सलामी भागीदारी संपुष्टात आणली.

48-0 (6 Ov) :RCB ची पॉवर प्लेमध्ये दमदार सुरुवात

आरसीबीने राजस्थानच्या 170 धावांचा पाठलाग करताना फाफ ड्युप्लेसिस आणि अर्जुन रावतने दमदार सलामी देत पॉवर प्लेमध्ये नाबाद 48 धावा केल्या.

20/ 169 - 3 : बटरल - हेटमायरची 83 धावांची भागीदारी

शिमरॉन हेटमारयने आकाश दीपला शेवटच्या चेंडूवर षटकार मारत राजस्थान रॉयल्सला 169 धावांपर्यंत पोहचवले. हेटमारयने 31 चेंडूत 42 धावा केल्या तर जोस बटलरने अँकर इनिंग खेळत 47 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली.

जोस बटलरचे दमदार अर्धशतक

राजस्थानचा ट्रम कार्ड जोस बटलरने शतकानंतर आज आरसीबीविरूद्ध अर्धशतक देखील ठोकले.

86-3 : संजू कडून निराशा 

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला वानिंदू हसरंगाने 8 धावांवर बाद केला. हा राजस्थानसाठी मोठा धक्का होता.

76-2 : हर्षल पटेलने जोडी फोडली

देवदत्त पडिक्कल आणि जोस बटलर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी झालेली 70 धावांची भागीदारी अखेर हर्षल पटेलने संपवली. त्याने पडिक्कलला 37 धावांवर बाद केले.

6-1 : राजस्थानला पहिला धक्का; सलामीवीर यशस्वी जैसवाल बाद 

डेव्हिड विलीने राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालला 4 धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला.

आरसीबीचा नाणेफेक जिंकून गोलंदाजाची निर्णय

आरसीबीने आपला दुसरा विजय केला साजरा

मुंबई : आरसीबीने राजस्थान रॉयल्सचे 170 धावांचे आव्हान 20 व्या षटकात पार करत आपला दुसरा विजय मिळवला. दिनेश कार्तिकने निम्मा संघ 87 धावात माघारी गेला असताना शाहबाज अहमदबरोबर 67 धावांची भागीदारी रचली. शाहबाजने 45 तर दिनेश कार्तिकने 44 धावा केल्या. आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिसने 29 तर अर्जुन रावतने 26 धावा केल्या.

वानखेडेवरील संथ खेळपट्टी पाहून राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने सावध सुरूवात केली. त्याने बॉल टू रन रणनितीने फलंदाजी करत अँकर इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने संपूर्ण 20 षटके खेळून काढत नाबाद 70 धावांचे योगदान दिले. सुरूवातीला बॉल टू रन पद्धतीने खेळणाऱ्या बटलरने स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज खेळी केली. त्याने षटकारांची बरसात करत राजस्थानला 3 बाद 169 धावांपर्यंत पोहचवले. बटलरला हेटमायरने चांगली साथ देत 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने देखील 37 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT